आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकार बेफिकीर, बांधकाम मंत्र्यांवर खुनाचा गुन्हा नाेंदवा - अजित पवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाड येथील पूल कोसळून झालेल्या प्राणहानीस राज्य सरकारची बेफिकिरी जबाबदार आहे. त्यामुळे राज्याचे सार्वजनिक बांधकाम, महसूल आणि मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीविरोधी पक्षांनी बुधवारी विधानसभेत केली. महाड येथील सावित्री नदीवरील पूल मंगळवारी मध्यरात्री वाहून गेल्याने दोन एसटी गाड्या आणि काही चारचाकी वाहने वाहून गेल्याने किमान २२ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात अाहे. या घटनेचे विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. प्रश्नोत्तराचा त्रास सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाड दुर्घटनेची माहिती सभागृहाला देण्याची मागणी केली.

‘सावित्री नदीवरील पूल कोसळून दोन एसटी गाड्या वाहून गेल्या. पूल कोसळल्यानंतर पोलिस व जिल्हा प्रशासनाने वेळीच पूल बंद केला असता तर मनुष्यहानी टाळता आली असती,’ असे विखे-पाटील म्हणाले. महाड दुर्घटना हे राज्य सरकारचे अपयश असल्याचे सांगून अजित पवार म्हणाले, “ब्रिटिशकालीन पुलाचे आयुष्य यापूर्वीच संपले असताना त्यावरची वाहतूक सुरू का ठेवली? सरकारने पूल बंद करायला हवा होता. वाहतूक सुरू ठेवणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करा. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज दिला होता; त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पावले उचलणे गरजेचे होते.’

कारवाईचे निर्देश
विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर विधानसभा अध्यक्षांनी दोषी अधिकाऱ्यांची ताबडतोब चौकशी करून कारवाईचे आदेश दिले. त्यावर ‘सर्व ब्रिटिशकालीन, जुन्या पुलांची पाहणी ‘आयआयटी’कडून केली जाईल. आवश्यक पुलांचे मजबुतीकरण आणि दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेतली जातील,’ असे आश्वासन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

पंधरा मिनिटांत यंत्रणा धावली : पाटील
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले, ‘रात्री पूल कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर पंधरा मिनिटांत सरकारी यंत्रणा घटनास्थळी गेल्या. दाेन एसटी गाड्या आणि लहान वाहनांचे शोधकार्य दोन हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरू आहे. ‘एनडीआरएफ’ प्रत्येकी ४० जवानांचे चार संघ शोधकामात अाहेत.’ परिवहनमंत्री दिवाकर रावते म्हणाले, ‘दोन एसटी गाड्यांमधल्या २२ प्रवाशांचा शोध सुरू आहे.’ तर पृथ्वीराज चव्हाण यांनीही सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप केला.
पुढे वाचा... दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा, दाेषी अधिकारी तत्काळ निलंबित करा - धनंजय मुंडे
बातम्या आणखी आहेत...