आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा समाजाच्या प्रश्नांवर सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा : अशाेक चव्हाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शेतकऱ्यांची कर्जमाफी, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर, बेरोजगारी, आरक्षण आदी समस्यांबाबत सरकार असंवेदनशील असून त्याबाबत मराठा समाजात प्रचंड प्रक्षोभ आहे. सरकारच्या उदासिनतेविरोधात निघाणाऱ्या या मोर्चावरून सरकारने अाता तरी बोध घ्यावा व गंभीर विचार करून त्यांच्या मागण्या तत्काळ पूर्ण कराव्यात, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

मराठा समाजाच्या प्रक्षोभाला भाजप सरकारची उदासिनता कारणीभूत आहे. शांततेत मोर्चे मराठा समाज आपल्या मागण्या सरकारसमोर मांडत असून आता फडणवीसांना ते दुर्लक्षित करून चालण्साार नाही, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

गांधी भवन येथे कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मराठा समाजाच्या आजपर्यंत झालेल्या मोर्चात लाखो लोक उस्फूर्तपणे सहभागी होत आहेत. त्यामुळे सरकारने आता तरी जागे होऊन मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा अशी कोणाचीच मागणी नाही. या कायद्याचा गैरवापर थांबला पाहिजे अशीच मागणी मराठा समाजाच्या मोर्चातही केली जाते. अॅट्रॉसिटी कायदा असला पाहिजे पण या कायद्याच्या अंमलबजावणीतील उणिवा दूर केल्या पाहिजेत, अशीच काँग्रेसची भूमिका असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाचे मोर्चे कोणत्याही समाजाविरुद्ध नाहीत. त्यांना राजकीय रंग देण्याचा प्रयत्न कोणी करू नये असे आवाहन चव्हाण यांनी केले.

दुष्काळ सेस रद्द करा
राज्यावर दुष्काळाचे संकट आल्याने सरकारने लोकांवरच याचा भार टाकला होता. काही तालुक्यांचा अपवाद वगळता यंदा सर्वत्र चांगला पाऊस झाला, तरीही लोकांवर लादलेला ‘सेस’ कायम आहे. तो तत्काळ रद्द करावा. सर्वसामान्य लोक आधीच महागाईमुळे बेजार असताना सरकारने व्हॅट एक टक्क्याने वाढवला आहे. यामुळे महागाई आणखी वाढणार असून ही करवाढ रद्द करावी अशी मागणी चव्हाण यांनी केली.

विष्णू सावरा यांची हकालपट्टी करा
कुपोषणामुळे राज्यात सहाशे बालकांचा बळी गेला तरी सरकार याबाबत गंभीर नाही. मुल गमावलेल्या एक मातेने आपला रोष आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्यासमोर व्यक्त केला तेव्हा मंत्र्यांनी बेजबाबदार विधान केले . त्यामुळे तेथील लोकांनी त्यांना हाकलून दिले. आता मुख्यमंत्र्यांनीही त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी चव्हाण यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...