आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Murder Sponseredship Experienced Raj Thakre, Nationalist Congress

सरकारपुरस्कृत हत्येचा राज ठाकरेंना अनुभवः रमेश किणी प्रकरणाकडे राष्‍ट्रवादीचे बोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा उलगडा जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत संशयाची सुई सरकारकडेच जाते,’ असा आरोप करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राष्‍ट्रवादी कॉँग्रेसने प्रत्त्युत्तर दिले आहे. ‘ठाकरे यांना सत्तेत असताना सरकारपुरस्कृत हत्येचा अनुभव आहे,’ अशी बोचरी टीका करत पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी रमेश किणी प्रकरणाकडे बोट दाखवले.

राज ठाकरे यांनी गुरुवारी डॉ. दाभोलकर यांच्‍या हत्‍येच्‍या तपासावरुन सरकारवर टीका केली होती. महिना होत आहे. तरी त्यांचे मारेकरी सापडत कसे नाहीत? तपासातील या विलंबामुळे सरकारवरच संशय बळावतो. त्‍यांची हत्या सरकारनेच तर स्पॉन्सर केली नाही ना?, असा सवाल करत राज ठाकरे यांनी सरकारवर आरोप केले होते. या आरोपांना नवाब मलिक यांनी प्रत्‍युत्तर दिले. राज ठाकरे केवळ प्रसिद्धीसाठीच अशी वक्तव्‍ये करतात, असे मलिक म्‍हणाले.

‘एनआयए’कडे तपासासाठी याचिका
बेकायदा प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन झाले असले तरच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास राष्‍ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देता येईल, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.
या हत्याकांडाचा तपास ‘एनआयए’कडे देण्याची मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार केतन तिरोडकर यांनी दाखल केली आहे. हत्येला एक महिना पूर्ण होत आहे. मात्र, अजूनही मारेक-यांचा सुगावा लागला नाही. दाभोलकर यांना काही महिन्यांपासून धमक्या मिळत होत्या. याबाबत राज्य सरकारलाही माहिती होती. मात्र, सरकारने त्यांना सुरक्षा पुरवली नाही. त्यामुळे आता तपास एनआयएकडे द्यावा, अशी याचिकेत मागणी आहे.