आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Not Wish To Find Killers, Govind Pansare Daughter Allaged Govenment

मारेकरी शोधण्याची सरकारची इच्छा नाही, गोविंद पानसरे यांच्या कन्येचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या होऊन महिन्याचा कालावधी उलटला असतानाही पोलिस योग्य दिशेने तपास करत नसून सरकारला मारेकरी शोधण्याची इच्छाशक्तीच नसल्याचा आरोप कॉ. पानसरे यांची मुलगी स्मिता यांनी गुरुवारी मुंबईत केला.

स्मिता यांनी त्यांच्या पतीसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी भाकपचे पानसरे यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने व्हावा, या मागणीसाठी आज आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला या प्रकरणात संशयित दीडशे जणांची चौकशी करण्यात आल्याची माहिती दिली. मात्र, तपासाची सुई धर्मांध शक्तींकडे वळवण्यात आल्याशिवाय या प्रकरणातील मारेकरी सापडणार नाहीत, असे आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले; पण त्यावर मुख्यमंत्र्यांनी कोणतेही भाष्य केले नाही, असे त्या म्हणाल्या.

पानसरे यांच्याप्रमाणे डॉ. दत्ता सामंत यांची मुंबईत हत्या झाली होती. त्यांचे मारेकरी काही काळाने सापडले; परंतु त्यामागचा मास्टरमाइंड अखेरपर्यंत सापडला नाही. तसाच प्रकार कॉ. पानसरे हत्या प्रकरणातही होईल, अशी भीती स्मिता यांनी पत्रकारांकडे बोलताना व्यक्त केली.