आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांना दोन दिवसांत द्या स्वतंत्र स्वच्छतागृहे, सरकारी कार्यालयांना आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एकीकडे महिला सक्षमीकरणावर सरकारी योजनांच्या माध्यमातून वारेमाप निधी खर्च केला जात असताना दुसरीकडे महिलांसाठी अजूनही पुरेशी स्वतंत्र स्वच्छतागृहे नाहीत, हे भीषण वास्तव आहे. सार्वजनिक ठिकाणे सोडा, प्रत्यक्ष सरकारी कार्यालयेही यातून सुटलेली नाहीत. याची गंभीर दखल कामगार विभागाने घेतली आहे.

ज्या सरकारी कार्यालयांत महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नाहीत तेथे आदेश निघाल्यापासून 48 तासांत ती बांधली जावीत, असे आदेश या विभागाने दिले आहेत. खासगी आस्थापनांमध्येही अशी स्वच्छतागृहे त्यांचे नूतनीकरण रोखले जाईल असा इशारा विभागाने आदेशात दिला आहे.

17 जुलैलाच आदेश
गेल्या 17 जुलैला कामगार विभागाने हा आदेश काढला असला तरी अजूनही अनेक सरकारी कार्यालयांमध्ये याची अंमलबजावणी झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. सरकारी कार्यालयांनी अर्थसंकल्पीय तरतुदीची वाट न पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने आदेश लागू केल्यापासून 48 तासात महिलांसाठी तात्पुरते स्वच्छतागृह उभारावे
असे आदेशात नमूद आहे. जे अधिकारी अशी सुविधा देण्यात कुचराई करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा विचार कामगार विभाग करत आहे.

असे आहे चित्र
०शासकीय सेवेत महिलांना 30 टक्के आरक्षण असल्याने कार्यालयांत महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
०2014 च्या महिला धोरणानुसार महिलांना कार्यठिकाणी स्वतंत्र स्वच्छतागृहांसह सर्व सोयी सुविधा देणे बंधनकारक आहे.
०अनेक कार्यालयांमध्ये महिलांना अनेक कार्यालयांत सुविधा नसल्याच्या तक्रारीनंतर कामगार विभागाने आदेश काढला.
कारखाने व खासगी आस्थापनांमध्ये अशी व्यवस्था करणे मालकांना बंधनकारक आहे

या आस्थापनांची नियमित तपासणी करून दोषी कारखाने व इतर खासगी आस्थापनांवर दंडात्मक कारवाईचे आदेशात नमूद आहे.