आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Government Planing Appoint Administration On Peoples

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘पीपल्स’वर प्रशासक नेमण्याचा शासनाचा डाव!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीवर प्रशासक नेमण्याचा शासनाचा डाव आहे, असा आरोप बहुजन विद्यार्थी परिषदेने केला आहे.


संस्थेवर ताबा कोणाचा, याविषयी अनेक वर्षे वाद आहे. रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात हा वाद होता. आता त्यामध्ये आनंदराज आंबेडकरही उतरले आहेत. नेमके विश्वस्त कोण, हा वाद उच्च न्यायालयात आहे. मात्र आठवले व दोन्ही आंबेडकर गट संस्थेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ‘आनंदभुवन’ इमारतीत नेहमीच तणावाची परिस्थिती उद्भवते. आनंदभुवन इमारत वारसा स्थळ यादीमध्ये आहे. या परिसरात कोणताही कठीण प्रसंग उद्भवू नये म्हणून मुंबई पोलिस आयुक्तांनी आठवले आणि दोन्ही आंबेडकर बंधू यांच्यासह 26 कार्यकर्त्यांना संस्थेत प्रवेशास मनाई हुकूम काढला आहे. आता संस्थेत प्रबळ असलेल्या बहुजन विद्यार्थी संघटनेने आंदोलनाची भाषा सुरू केली आहे. ही संघटना आठवले समर्थक मानली जाते. त्यामुळेच या विद्यार्थी संघटनेने शासनाला संस्थेवर प्रशासक नेमायचा असल्याचा संशय व्यक्त केला आहे. शासनाने संस्था इमारतीभोवतीचे पोलिस हटवले नाहीत तर पावसाळी अधिवेशनात विधिमंडळात घुसण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.