आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावरकरांचा सोईनुसार वापर, शरद पवार यांची भाजपवर अप्रत्यक्ष टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘गाय उपयुक्त पशू आहे, उपयु्क्तता संपली की तो कापूनही खाता येतो’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते. मात्र, सावरकरांच्या तत्त्वाचे राजकारण करणारे राजकीय पक्ष आणि संघटना स्वार्थी हेतू तडीस नेण्यासाठी सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांना फाटा देत त्यांचे विचार सोईनुसार वापरत आहेत. त्यामुळेच गोमांसाचा वाद उभा राहिला असून दादरीसाखी भयानक घटना घडली,’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप आणि संघावर अप्रत्यक्ष टीका केली.

डॉ. विवेक कोरडे यांच्या ‘जातीयवादी राजकारणाचा अन्वयार्थ’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात पवार बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत राम पुनियानी, मुंबई सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष जयंत दिवाण आदी उपस्थित होते. ‘आज देशातील वातावरण चिंता करायला लावणारे आहे. कुणी काय खावे, हे एक वर्ग ठरवू पाहत आहे. पूर्वीही लेखकांवर आरोप व्हायचे, पण ते आडोशाने. असहिष्णू वातावरणाबद्दल आज जी लेखक मंडळी पुरस्कार परत करत आहेत, त्यांच्यावर होणारी टीका अत्यंत दुर्दैवी आहे. वेगळी भूमिका मांडणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांना ‘पाहून घेऊ’ अशी जाहीर धमकी दिली जाते. आपल्यापेक्षा वेगळा विचार मांडणाऱ्यांना धमकी देण्याचं धाडस या मंडळींना आलं कुठून?, असा सवाल पवारांनी केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वातंत्र्य चळवळीत सहभागी नव्हता. कारण त्यांचा अजेंडा हिंदुत्वाचा होता. संघाची मंडळी देशभक्त जरूर आहेत, मात्र ती निधर्मी भारताची नव्हे तर हिंदू राष्ट्राची आहेत, असा आरोप विचारवंत प्रा. राम पुनियानी यांनी केला, तर सन १८५७ चे बंड ते बाबरी मशीद प्रकरण या काळातील भारतीय राजकारणाचा पट पुस्तकात मांडल्याची माहिती लेखक डॉ. विवेक कोरडे यांनी दिली.

पुढे वाचा... सनातन संस्थेवरही अप्रत्यक्ष टीकास्त्र