आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याची अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून, सरकारने केले गोवंश हत्याबंदीचे समर्थन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्याची अर्थव्यवस्था अजूनही शेतीवरच अवलंबून आहे. शेतीपूरक उद्योगासाठी बैल, गाईची उपयुक्तता शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे राज्यात लागू करण्यात आलेली गोवंश हत्याबंदी योग्यच असल्याचे शपथपत्र राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात सादर केले.

गोवंश हत्याबंदीविरोधात दाखल याचिकेवर सरकारने हे शपथपत्र दाखल केले अाहे. अलीकडेच फडणवीस सरकारने राज्यात गोवंश हत्याबंदीचा कायदा केला अाहे. मात्र काँग्रेस, रिपाइंसह अनेक संघटनांनी या निर्णयाला विराेध करत बंदी उठवण्याची मागणी केली आहे. तसेच या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांनी राज्यभरात या बंदीचा निषेध करून आंदोलन सुरू केले आहे. मात्र, सरकारने दाखल केलेल्या शपथपत्रात सांगितले की, राज्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. शेतीपूरक उद्योग व शेतकामासाठी बैल व गाईची शेतकऱ्यांना उपयुक्तता आहे. त्यामुळे घातलेली बंदी योग्य असल्याचे सरकारने म्हटले आहे.