आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फास अावळला : मुस्लिम धर्माेपदेशक झाकीर नाईकच्या भाषणांची चाैकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ नवी दिल्ली - सरकारने मुस्लिम धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईकभोवती फास आवळण्यास सुरुवात केली आहे. डॉ. नाईकच्या कथित आक्षेपार्ह भाषणांची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना दिले आहेत. बांगलादेशची राजधानी ढाक्यातील एका हॉटेलवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांपैकी दोघे अतिरेकी डॉ. नाईकच्या द्वेषमूलक भाषणामुळे प्रेरित झाल्याचे समोर आल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू आणि केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी गुरूवारी डॉ. नाईकची भाषणे ‘अत्यंत आक्षेपार्ह’ असल्याचे गुरुवारी सांगितले. सरकार त्याच्याविरुद्ध कारवाई करू शकते. हे कायदेशीर प्रकरण आहे, असे ते म्हणाले. ढाक्यात मारल्या गेलेल्या अतिरेक्यांवर नाईकच्या भाषणांचा प्रभाव होता. एका अतिरेक्याने तर आपल्या फेसबुक वॉलवर नाईकचा संदेशही पोस्ट केला होता. त्यात डॉ.नाईकने सर्व मुस्लिमांना अतिरेकी बनण्याचा आग्रह केला होता. नाईकच्या भाषणांची चौकशी करावी, असा आग्रह बांगलादेशने भारताकडे धरला होता.

दिग्विजय सिंहांनी जाकीरला म्हटले होते ‘शांतिदूत’:
काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी २०१२ मध्ये जाकीर नाईकचे कौतुक केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी नाईकबाबत ‘ तुम्ही जगात शांतीच्या संदेशाचा प्रसार करत आहात, याचा मला आनंद आहे,’म्हटले होते. त्यावरून भाजपने काँग्रेसने टिकास्त्र सोडले आहे. गुरूंनी तरूणांना अतिरेकी बनण्यापासून रोखावे, अशी आमची अपेक्षा आहे. मात्र नाईक प्रत्यक्षात दहशतवादाला प्रोत्साहन देत आहेत, असे भाजप प्रवक्ते जी. व्ही. एल. नरसिंहाराव म्हणाले. मात्र त्या कार्यक्रमात आपण धार्मिक सदभावनेचे आवाहन केले होते, असा खुलासा दिग्विजय सिंह यांनी केला आहे.
मुंबईच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा संस्थापक आहे झाकीर
२००० : शिकागोमध्ये विल्यम कॅम्पबेलशी ‘कुराण व बायबल : वैज्ञानिक दृष्टिकोन’ विषयावर वादविवाद. चर्चित वक्ते.
२००६ : श्री श्री रविशंकर यांच्याशी ‘इस्लाम व हिंदुत्वात ईश्वर संकल्पना’आंतरधर्म संवाद.
२००७ : पासून मुंबईत १० दिवसीय शांतता परिषद सुरू. मागील काही वर्षे मुंबई पोलिसांची परवानगीस ना.
२०१० : बिन लादेनला अतिरेकी न मानल्यामुळे ब्रिटन,कॅनडात प्रवेशबंदी.
१३ अब्ज जकात? झाकीरच्या संस्थेला दरमहा १३ अब्ज रुपये जकात: काउंटर टेररिझमचा दावा.

लोकप्रिय परंतु वादग्रस्त धर्मोपदेशक
डॉ. नाईक मुंबईस्थित इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा संस्थापक आहे. तो पीस टीव्हीचा तो सहसंचालकही आहे. बालपणी अडखळत बोलणारा झाकीर आज अस्खलित इंग्रजी बोलतो. टोपीवाला मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस झाला. १९८७ मध्ये दक्षिण आफ्रिकी मुस्लिम धर्मोपदेशक शेख अहमद दीदतच्या भाषणाने प्रभावित होऊन डॉक्टरी पेशा सोडून १९९१ मध्ये धर्मोपदेशक बनला.

आरोप
डॉ. झाकीर नाईकने ‘पीस टीव्ही’या आंतरराष्ट्रीय इस्लामी चॅनलवरील एका व्याख्यानात जगातील सर्व मुस्लिमांना अतिरेकी बनण्याचे कथित आवाहन केल्याचा आरोप आहे.
बंदी
अन्य धर्मांविरुद्ध द्वेषभावना फैलावणाऱ्या उपदेशामुळे ब्रिटन, कॅनडामध्ये त्याच्या भाषणांवर बंदी आहे. मलेशियातही बंदी असलेल्या १६ मुस्लिम विद्वानांमध्ये नाईकचाही समावेश आहे.
खुलासा
अवामी लिगच्या नेत्याचा मुलगा व अतिरेकी रोहन इम्तियाज मागच्या वर्षी नाईकचा हवाला देऊन फेसबुकवर अपप्रचार करत होता, असे वृत्त बांगलादेशी दैनिक ‘डेली स्टार’ने दिले.
स्पष्टीकरण
आपण दहशतवाद व निष्पापांचे जीव घेण्याच्या विरोधात आहोत. प्रत्येक मुस्लिमांनी समाजघातक घटकांविरुद्ध अतिरेकी बनले पाहिजे, असे आपण म्हणालो होतो, असे नाईकने मक्केत वृत्तसंस्थेला सांगितले.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...