आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Will Give 35oo Metric Ton Grain For Mahakumbh

कुंभमेळ्यासाठी ३५०० मेट्रिक टन धान्य देणार, सरकारच्या तिजोरीवर ५० कोटींचा भार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जुलैपासून नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यास सुरुवात होणार आहे. या कुंभमेळ्यास देश-विदेशातून साधूसंत उपस्थित राहातात. त्यांच्यासाठी अन्नधान्याची व्यवस्था राज्य सरकारतर्फे करण्यात येते. याकरिता राज्य सरकारने ३५०० मेट्रिक टन धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी राज्याच्या तिजोरीवर ५० कोटींचा भार पडणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागातील अधिकाऱ्याने दिली.

१४ जुलै २०१५ पासून ध्वजारोहणाद्वारे सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात होत आहे. चार महिने सुरू राहाणाऱ्या या कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणार अन्नधान्याची आवश्यकता भासणार आहे. अन्य ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळ्यात तेथील राज्य सरकार वाजवी दरात अन्नधान्य उपलब्ध करून देत असल्याने राज्य सरकारनेही वाजवी दरात अन्नधान्यासह साखर, घासलेट, घरगुती वापराचा गॅस उपलब्ध करून द्यावा अशी मागणी काही महिन्यांपूर्वी आखाडा समित्यांतर्फे राज्य सरकारला करण्यात आली होती, परंतु राज्य सरकारकडे अन्नधान्याचा पुरेसा साठा नसल्याने केंद्राला अन्नधान्य पुरवण्याची विनंती करण्यात आली होती. केंद्र सरकारने राज्याच्या विनंतीला मान देऊन २१०० मेट्रीक टन गहू आणि १४०० मेट्रिक टन तांदूळ पाठवला आहे. यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारला किमान आधारभूत दर देणार आहे.