आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकऱ्यांना सोप्या भाषेत हवामानाची माहिती, मराठी वाहिन्यांची मदत घेणार : मुख्यमंत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना हवामान आणि पावसाच्या शास्त्रशुद्ध अंदाजाची माहिती तांत्रिक भाषेचा वापर न करता स्थानिक आणि सोप्या भाषेत दिली जाईल. ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पाेहाेचवण्यासाठी एसएमएस, खासगी मराठी वाहिन्यांची मदत घेतली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले.

मंत्रालयात कृषी हवामान अंदाज यंत्रणेबाबत बैठक घेण्यात आली. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. परिवहन मंत्री दिवाकर रावते, पणन राज्यमंत्री प्रा.राम शिंदे या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘हवामानाच्या अंदाजाबाबत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध माहिती पुरविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. बदलत्या हवामानाची शेतकऱ्यांना वेळेवर माहिती झाल्यास त्यांना त्यानुसार पीक पद्धतीत बदल करता येईल. केंद्रीय वेधशाळा आणि राज्यस्तरीय कृषी सल्लागार समिती यांच्या माध्यमातून १० लाख शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे कृषी विषयक सल्ला व मार्गदर्शन करण्यात येते. यामध्ये अधिक अचूकता आणण्यासह तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून ही तांत्रिक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांना देण्यात यावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ग्रामपंचायतीत एलईडी
हवामानाची सतत माहिती उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये केऑस आणि एलईडी स्क्रीन उपलब्ध करून त्या माध्यमातून स्थानिक भाषेत हवामानाची माहिती द्यावी, जिल्हानिहाय हवामानाची माहिती एसएमएस आणि अन्य माध्यमांचा वापर करून शेतकऱ्यांना कळवण्यात यावी, एसएमएस सेवेचा राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी शेतकऱ्यांचे मोबाइल क्रमांक मिळविण्यासाठी मोबाइल कंपन्यांकडे संपर्क साधावा, मराठी वाहिन्यांवर विशिष्ट वेळ राखून त्याद्वारे हवामानातील बदल आणि पावसाचा अंदाज याबद्दलची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पाेहाेचवावी जेणेकरून त्यांचे नुकसान टळण्यास मदत होईल, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या अाहेत.
बातम्या आणखी आहेत...