आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाेकांपर्यंत पाेहाेचण्यासाठी सरकारचा खासगी ‘PR’; लाेकांचे अभिप्राय सरकारपर्यंत पाेहाेचवणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सरकारी निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पाेहाेचवण्यासाठी व जनतेच्या अपेक्षा सरकारपर्यंत पाेहाेचवण्यासाठी खासगी ‘पीअार’कंपनी नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला अाहे. याबाबतचा जीअार नुकताच काढण्यात अाला. 

माहिती व जनसंपर्क विभागातील संचालकांच्या नेतृत्वाखालील समितीच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात अाला. ही पीअार एजन्सी सरकारच्या याेजना सामान्य लाेकांपर्यंत पाेहाेचवणार तर अाहेच. त्याशिवाय सरकारी याेजनांबाबत लाेकांचे अभिप्राय व सूचनाही सरकारपर्यंत पाेहाेचवणार अाहे. सरकारी याेजनांचे लाभ थेट गरजूंपर्यंत पाेहाेचवण्यासाठी यातून फायदा हाेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात अाहे. या खासगी कंपनीला किती माेबदला देणार याबाबत मात्र अद्याप जाहीर केलेले नाही.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...