आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसआरए घोटाळ्याप्रकरणी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांच्या चौकशीचे राज्यपालांचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एसआरए घोटाळ्याप्रकरणी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश राज्यपालांनी लोकायुक्तांना दिले आहेत. मेहता यांची चौकशी करण्याची समंती राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे मागण्यात आली होती. त्यानुसार राज्यपालांनी लोकायुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश मेहतांची चौकशी लोकायुक्तांकडून करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रकाश मेहता आमदार असल्याने लोकायुक्तांकडून चौकशी होण्याअगोदर राज्यपालांची संमती आवश्यक होती. मुख्यमंत्र्यांनी संमती देण्यासाठी राज्यपालांना विनंती केली होती.
 
प्रकाश मेहतांवरील आरोप 
मुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात एफएसआय घोटाळा केल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर आहे. विकासकाला फायदा देण्यासाठी प्रकाश मेहता यांनी नियम बाजूला ठेवून एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप होत आहे.
 
एका विकासकाला 3K च्या नियमात फायदा देण्यासाठी धोरण ठरवता येत नसल्याचे कारण सांगत गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी प्रस्तावाला विरोध केला होता. तसेच पीएपी (प्रकल्पबाधितांची घरं) संदर्भातही प्रस्तावावरही त्यांनी प्रतिकूल शेरा मारला होता. 
पण मेहता यांनी ही फाईल मंजूर करताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारला होता.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...