आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसाव्या शतकात देशात विज्ञाननिष्ठा पहिल्यांदा सावरकरांनीच चर्चेत आणली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईत भरलेली १०२ वी भारतीय विज्ञान परिषदेत विज्ञानातील आव्हाने याऐवजी उद‌्घाटनापासून वादग्रस्त विधानांनी गाजत असून बुधवारी या परिषदेचा समारोपही वादग्रस्त विधानांनीच झाला. ‘विसाव्या शतकात देशात विज्ञाननिष्ठा पहिल्यांदा स्वातंत्र्यवीर सावकर यांनीच चर्चेत आणली, असे विधान करून परिषदेचा समारोपही वादग्रस्त विधानांनीच केला.

पाच दिवसांपासून मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या भारतीय विज्ञान परिषदेचा बुधवारी समारोप झाला. या वेळी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

नाईक म्हणाले, प्रगत वैज्ञानिक मानसिकतेमुळे समाज प्रगतिशील होतो. विसाव्या शतकात सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी विज्ञान निष्ठा देशात पहिल्यांदा चर्चेचा विषय बनवला. सावरकरांच्या दूरदृष्टीला माझा प्रणाम असे मत मांडले.

मुंबईत १९६० नंतर पहिल्यांदाच होत असलेली विज्ञान परिषद आयोजनापासून वादग्रस्त बनली आहे. परिषदेच्या उद्घघाटनाच केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी बीजगणित आणि पायथागोरस सिद्धांताचा शोध सवर्प्रथम भारतीयांनी लावल्याचे विधान केले होते. त्याचे पडसाद विरत नाहीत तोच पायलट ट्रेनिंग स्कूलचे िनवृत्त प्राचार्य डॉ. आनंद बोडस यांनी सात हजार वर्षांपूर्वी भारतात जंबो विमाने होती. ती विमाने परग्रहावरसुद्धा जात असत असे विधान केले होते. त्यामुळे मुंबईतील भारतीय विज्ञान परिषद जगभर चर्चेत आली होती.

या वेळी व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, विज्ञान परिषेचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव निमसे आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
लाज नको, गर्व हवा
हर्षवर्धन आणि डॉ. बोडस यांचा धागा पकडत परिषदेच्या समारोपात राम नाईक यांनी प्राचीन भारतीय विज्ञानाचे मोठे गोडवे गायले. प्राचीन भारतीय विज्ञान-तंत्रज्ञानासंदर्भात आपल्याला लाज वाटते. अशी लाज न बाळगता, आक्षेप न घेता गर्व बाळगा, असा सल्लाही त्यांनी समस्त शास्त्रज्ञ वर्गाला या वेळी दिला.
नाईकांचे बोल!
१ पाणिनी, चरक, सुश्रूत, धन्वंतरी, वराह मिहीर, आर्यभट्ट आपले मानबिंदू आहेत.
२ खगोल, भौतिकी, आयुर्वेद, व्याकरण, वास्तुशास्त्र, ज्‍योतिषीकला यात प्राचीन भारताने मोठी प्रगती केली होती.
३ पुढील विज्ञान परिषदेत योगशास्त्रावरही सत्रे व्हायला हवीत.
४ वैदिक गणित अचूकता आणि सुलभतेबाबत जगात अव्वल होते.