आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Governor Ram Naik Will On Four Day Visit Of Mumbai

पाच वर्षे मुख्यमंत्रीपद कसे टिकवायचे याचा मंत्र मला शिवसेनेकडूनच मिळाला- फडणवीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विधानसभेत पहिल्यांदा िनवडून आल्यानंतर मला िदल्लीत राम नाईक यांच्या लोकप्रतिनिधी मार्गदर्शन वर्गात उपस्थित राहण्याची संधी िमळाली होती. या वर्गात ते म्हणाले होते की, आमदारांनी िवधानसभेत असताना मतदारसंघाचा िवचार करायला हवा आणि मतदारसंघात िफरताना िवधानसभा डोळ्यासमोर ठेवावी. िवधानसभेत असताना मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवला की आपल्याला कुठले प्रश्न सोडवायचे आहेत हे समजते, तर मतदारसंघात िफरताना कुठल्या प्रश्नांवर लक्षवेधी, सूचना, चर्चा, औचित्याचा मुद्दा अशी आयुध वापरायला हवी हे डोक्यात यायला हवे. असे केले तर तुम्ही आपोआप उत्तम लोकप्रतिनिधी होता. रामभाऊंचे हे वाक्य मी आयुष्यभर िवसरलेलो नाही. त्यामुळेच मला उत्तम संसदपटू पुरस्कार मिळू शकला. रामभाऊंनी आखून िदलेल्या या मार्गावरून मी आजही चालतो आणि इतर अामदारांनाही यावरून चालण्यासाठी प्रोत्सािहत करतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांचे आभार मानले. िनमित्त होते नाईक यांच्या "चरैवती-चरैवती' या पुस्तक प्रकाशनाचे.

यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या वेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार िशंदे यांच्यासह माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष िवनय सहस्रबुद्धे उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यकर्ता, पदाधिकारी, भाजप अध्यक्ष, आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपाल असा प्रदीर्घ प्रवास करणाऱ्या नाईक यांनी प्रत्येक भूमिका िनष्ठेने पार पाडली. याचे मुख्य कारण म्हणजे िशरलेल्या प्रत्येक भूमिकेला पूर्ण न्याय देताना त्यांनी स्वत:ला झोकून देऊन काम केले. एखाद्या गोष्टींचा पाठपुरावा करून ती पूर्ण कशी करावी हे रामभाऊंकडून िशकावे. व्यवस्थापन चांगले करत आले तर एका माणसाला आपल्या जीवनात खूप काम करता येते, हे राम नाईक यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत दाखवून िदले आहे, असा शब्दात मुख्यमंत्र्यांनी नाईक यांचा गौरव केला.

राजकीय जीवनात किती नम्र असावे, याविषयीचे रामभाऊंचे उदाहरण मुख्यमंत्र्यांनी सांिगतले. मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष असताना रामभाऊंचा फोन आला. मी यापुढे खासदारकीची िनवडणूक लढवणार नाही. मी त्यांना म्हणालो, िनवडणुकीचे वारे भाजपच्या िदशेने वाहत असून तुम्ही आरामात िजंकाल, केंद्रीय मंत्री व्हाल. यावर रामभाऊंचे उत्तर होते, माझा िनर्णय पक्का आहे. मी यापुढे फक्त पक्षाने िदलेले काम करणार. तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, मला कुठलेही काम द्या. मी थक्क झालो. इतकी वर्ष पक्षात मोठमोठी पदे सांभाळूनही एखाद्या माणसाचे पाय िकती जमिनीवर असू शकतात, हे उत्तम उदाहरण होते. आपण सर्वांनी त्यांचा आदर्श ठेवायला हवा.

म्हाळगी, वाजपेयी, अडवाणी यांच्यामुळे घडलो : राम नाईक
माझ्यासमोर रामभाऊ म्हाळगी, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे आदर्श माझ्यासमोरअसल्याने सामान्य कार्यकर्ता ते राज्यपाल अशी मोठी झेप मला घेता आली. विरोधी पक्षातही असताना तुम्हाला खूप चांगली कामे करता येतात, हे या सर्वांकडून मी िशकलो. आज मी वयाच्या ८२ व्या वर्षीही कार्यरत आहे तो कार्यकर्त्यांच्या सहवासामुळे. पुस्तकाच्या चरैवती या नावाप्रमाणे मी न थकता चालत असून बारा एक तास काम करतो. चरैवती हे माझे आत्मचरित्र नसून आठवणी आहेत. मी हे पुस्तक माझ्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो, असे राम नाईक म्हणाले.

युती सांभाळा, मुख्यमंत्रिपद टिकेल!
भाजप-शिवसेनेची युती नीट सांभाळली तर मुख्यमंत्रिपद टिकवणे फार कठीण राहणार नाही. १९९५ मध्ये युतीचा मुख्यमंत्री झाल्यानंतर ही कसरत यशस्वीपणे सांभाळली होती. तुम्ही माझ्याकडून शिका. तुम्हाला फार काळजी करावी लागणार नाही, असे मला माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी नुकतेच सांगितले, असे फडणवीस म्हणाले. भाजपचे शिवसेनेबरोबर असलेले सध्याचे संबंध पाहता फडणवीस यांचे जाहीर कार्यक्रमातील हे बोलणे खूप काही सांगून जाणारे आहे.