आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Governor Very Unhappy About Dabholkar Murder Investigation

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या तपासाबाबत राज्यपालांनी व्यक्त केली चिंता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दोन आठवडे उलटले तरी पोलिस तपासात प्रगती झालेली नाही. त्याबद्दल राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी मंगळवारी चिंता व्यक्त केली. भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, शेकापचे नेते प्रा. एन. डी. पाटील, लोकभारतीचे आमदार कपिल पाटील, सीपीएमचे आमदार राजाराम ओझरे यांनी राज्यपालांची भेट घेतली. शासनाला या प्रकरणाचे गांभीर्य नसल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला. त्यावर याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असून या तपासाबाबत मीही समाधानी नाही, असे राज्यपाल म्हणाल्याचे पाटील यांनी सांगितले.