आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समीरने प्रेयसीला फोन करून सांगितले पानसरेंना कसे मारले, ठोस पुरावे हाती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात "सनातन संस्थे'चा कार्यकर्ता समीर गायकवाड याचा सहभाग असल्याचे स्पष्ट पुरावे पोलिसांकडे आहेत. हत्येचा हेतू अजून समजला नसल्याने त्याची चौकशी सुरू आहे. हत्येत ‘सनातन’चा सहभाग आहे का याचाही तपास सुरू आहे. सहभाग आढळला तरच सनातनवर बंदी घालण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. मात्र, तपास सुरू असल्याने आणि अजून काहीही सिद्ध न झाल्याने सध्या काहीही सांगणे योग्य ठरणार नाही, अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
डॉ. दाभोलकर व पानसरे हत्याप्रकरणी दोन कोटी कॉल तपासल्यानंतर समीरच्या कॉलचा सुगावा लागला. प्रेयसीला फोन करून पानसरेंना कसे मारले याची फुशारकी त्याने मारली. त्यामुळे पानसरेंच्या हत्येत त्याचा हात असल्याचे निश्चित झाले. त्याने हत्या कोणाच्या सांगण्यावरून केली याचा तपास सुरू आहे, असेही अधिकारी म्हणाला.
पुढील स्‍लाईड्सवर वाचा..
पानसरेंची हत्या झाली तेथेच समीरचे सीमकार्ड अॅक्टिव्ह
सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांचा आरोप
मडगाव स्फोटातील आरोपीच्या पत्नीकडे समीरचे वकीलपत्र
सध्‍या कोठे आहे समीर....