आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Govinda Pathak Courageous Game Different From Dahihandi

गाेविंद पथकांचा साहसी खेळ दहीहंडीपासून वेगळाच ठेवा, समन्वय समितीची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गोविंदा या साहसी खेळाला अधिकाधिक व्यावसायिक आणि तांत्रिक करून तो दहीहंडी या सणापासून वेगळा ठेवा, अशी प्रमुख मागणी गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा देण्यासाठी स्थापन केलेल्या समितीच्या बैठकीत शुक्रवारी करण्यात आली. या बैठकीत गोविंदा या खेळाची सर्वसाधारण नियमावली आणि गोविंदा पथकांच्या अपेक्षांवर चर्चा करण्यात आली. या संपूर्ण चर्चेचा गोषवारा सोमवारी क्रीडामंत्री विनोद तावडेंना सादर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील गोविंदांना खेळाडूंचा तसेच गोविंदा या क्रीडाप्रकाराला साहसी खेळाचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या समन्वय समितीच्या बैठकीत अधिका-यांनी सादर केलेल्या मसुद्यावर सुमारे दोन तास चर्चा झाली. या चर्चेअंती एक नियमांचे प्रारूप तयार करण्यात आले असून खेळांच्या गुणांकनाबाबत चर्चा होणे बाकी आहे. ती चर्चा पूर्ण करून सोमवारी समितीचा हा अहवाल राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांना सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर या अहवालावर विचार करून सरकारच्या वतीने एक धोरण लवकरच जाहीर करण्यात
येणार आहे.

शुक्रवारी झालेल्या बैठकीत समितीचे सदस्य, शासकीय अधिकारी, गोविंदा पथकांचे प्रतिनिधी आणि विविध विषयांतील तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीत प्रामुख्याने खेळासाठीचे नियम आणि आचारसंहितेवर चर्चा करण्यात आली.

बैठकीतील मुद्दे
>गाेविंदांचा मनाे-याचा खेळ फक्त
दिवसाच्या प्रकाशातच खेळला जावा. जेणेकरून मोठ्या फ्लडलाइट्समुळे गोविंदांच्या डोळ्यांना होणारा त्रास आणि त्यामुळे अपघात होणार नाहीत.
>सुरुवातीच्या काळात हा खेळ राज्याच्या सर्व भागात पोहोचावा. यासाठी वयोमर्यादा १८ ते ५० इतकी असावी.
>मैदानावर खेळाचे आयोजन करताना रबर मॅट, सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, वैद्यकीय सुविधा अशा सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना असाव्यात.
>सक्षम शासकीय यंत्रणेमार्फत आयोजनाच्या जागेचे परीक्षण करावे.
>दहीहंडी या सणापासून वेगळा ठेवून गोविंदा हा खेळ व्यावसायिक स्तरावर आणावा.