आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- दहीहंडी मंडळाचे गोविंदा आणि गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना मुंबई पालिकेने आर्थिक सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. जखमीला 15 हजार रुपये आणि मृत्यू ओढावल्यास 1 लाखाची मदत गोविंदा आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना देण्याचा निर्णय बृहन्मुंबई पालिकेने घेतला आहे.
मुंबईत गणेश उत्सव आणि कृष्णाजन्माष्टमीला दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात करण्यात येतो. गणेश विसर्जन करताना मंडळाचे कार्यकर्ते चौपाट्यांवर बुडून मृत्यू पावण्याच्या घटना घडतात. तसेच दहीहंडी फोडताना अपघात होऊन अनेक गोविंदा जखमी होत असतात. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना आणि गोविंदांना उत्सवादरम्यान पालिकेने विमा संरक्षण द्यावे अशी मागणी मुंबईतील सार्वजनिक मंडळांकडून अनेक वर्षे सातत्याने करण्यात येत होती.
पालिकेच्या वतीने गणेशभक्त आणि गोविंदांना विमा संरक्षण पुरविण्याची सूचना महापौर सुनील प्रभू यांनी आयुक्तांना केली होती. मुंबईतील गणेश मंडळे आणि गोविंदांचा उत्सवादरम्यान विमा उतरवण्यासाठी पालिकेस केवळ 47 लाख रूपयांचा भार पडणार होता; परंतु विम्याचे आर्थिक संरक्षण देण्यास पालिकेस तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे विम्या ऐवजी थेट आर्थिक मदत देण्याचा निर्णय पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी यंदापासून होणार आहे. मुंबईतील गणेश आणि गोविंदा मंडळांनी पालिकेच्या या निर्णयाचे
स्वागत केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.