आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Govindrao Adhik May Leave Ncp Soon, Joins With Vinayak Mete

गोविंदराव आदिक राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार, शिवसंग्रामच्या वाटेवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे बडे नेते गोविंदराव आदिक राष्ट्रवादीवर नाराज आहेत. पक्षात आपली राजकीय क्षमता सिद्ध करण्यासाठी संधी मिळत नसल्याने आदिकांनी राष्ट्रवादीला राम-राम करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. तसेच ते विनायक मेटेंच्या संपर्कात असून ते शिवसंग्रामच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेला नुकतेच राजकीय पक्षाचे स्थान देण्यात आले आहे. तसेच मेटे यांचा संघटना-पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे. कदाचित आदिक द्वारे आपले नशीब अजमाविण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रविवारीच 15 वा वर्धापनदिन झाला. मात्र या वर्धापनदिनाकडे आदिक यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे ते पक्षावर नाराज असल्याची चर्चेने जोर धरला. शरद पवार जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा आदिक आणि पवार यांच्यात चांगले संबंध होते. त्यामुळे 2008 साली मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळातून डावलताच आदिक यांनी काँग्रेस सोडत पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर पवार यांनी आदिक यांना राज्यसभेवरही पाठवले. मात्र अलीकडे त्यांना पक्षातून डावलण्यात येत असल्याचे व पक्षात ज्येष्ठतेनुसार स्थान दिले जात नसल्याची भावना आदिक यांची झाल्याचे कळते. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादीला राम-राम करण्याचा निर्णय आहे. लोकसभा निवडणुकीतही आदिक यांच्यावर राज्यातील कोणतेही विशेष जबाबदारी दिली नव्हती. त्यामुळे काँग्रेसमध्ये जे भोगायला मिळाले तेच राष्ट्रवादीत होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी शिवसंग्रामसारख्या नवख्या पक्षात काम करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. याबाबत मंगळवारपर्यंत निर्णय होणार असल्याचे कळते.