आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गायब डॉक्टरांवर बडतर्फीची कु-हाड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या काही वर्षांपासून सरकारी सेवेतून गायब असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागातील 178 सरकारी डॉक्टरांना सेवेतून काढून टाकण्याची कारवाई सुरू केल्याची माहिती आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिका-याने शुक्रवारी ‘दिव्य मराठी’ला दिली. हे अधिकारी कोणत्याही कारणाशिवाय सेवेतून गायब असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारला त्यांच्यावर कारवाईला मुहूर्त सापडला आहे.
राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सेवेत असलेल्या सुमारे 227 डॉक्टर कोणतेही कारण न देता गेल्या दोन ते पंधरा वर्षांपासून आपल्या कर्तव्यावर हजर राहिले नसल्याचे उघड झाले आहे. राज्य सरकारने राज्यात सध्या डॉक्टरांची भरती प्रक्रिया सुरू केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. या डॉक्टरांच्या जागा रिक्त असल्याचे दिसत नाही. मात्र, प्रत्यक्षात ते कर्तव्यावर नसल्याने आरोग्य सेवेचाही बोजवारा उडतो आहे. तसेच हे डॉक्टर अजूनही सरकारी डॉक्टर असल्याचे पद मिरवत खासगी रुग्णसेवेच्या माध्यमातून भरमसाट पैसा कमावत आहेत. मात्र, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला नाही. त्यामुळे नवीन डॉक्टरांसाठी पदेही रिक्त झालेली नाहीत. अशा गायब डॉक्टरांवर बडतर्फीची कारवाई झाल्यानंतर त्या जागी नवीन डॉक्टर नियुक्त करण्याचा पर्याय
खुला होणार असल्याचेही विभागाकडून सांगण्यात आले.
नोटिसीद्वारे 15 दिवसांची मुदत
सेवेतून गायब असलेल्या 227 डॉक्टरांना आरोग्य विभागाने नोटीस बजावून 15 दिवसांत हजर न झाल्यास सेवेतून काढून टाकण्याचा इशारा दिला आहे. ही नोटीस मिळताच 48 डॉक्टरांनी पुन्हा सेवेत दाखल होण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, 178 जणांनी कोणताच प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे अशा डॉक्टरांना सेवेतून काढून टाकण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिका-याने दिली आहे.