आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परदेशातील नाेकऱ्या देणार सरकारी ग्लाेबल प्लेसमेंट सेंटर, मंत्री निलंगेकर यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - परदेशात माेठ्या पगाराची नाेकरी देण्याचे अामिष देऊन तरुणांची फसवणूक हाेण्याचे प्रकार अनेकदा घडतात. मात्र, अाता लवकरच यावर नियत्रंण येणार आहे. राज्यातील कुशल उमेदवारांच्या काैशल्याचा अभ्यास करून त्यांना परदेशात याेग्य नाेकरी िमळवून देण्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली अाहे. परदेशातील नाेकऱ्या िमळवून देण्यासाठी सरकार जागतिक स्तरावरील ‘प्लेसमेंट सेंटर’ लवकरच सुरू करणार अाहे. या केंद्रामुळे राज्यातील ३५ लाख बेराेजगारांना परदेशातील नाेकरीच्या संधी उपलब्ध हाेणार अाहेत.

अाैद्याेगिक प्रशिक्षण संस्थांमधून उत्तीर्ण हाेणाऱ्या उमेदवाराला जगभरात मागणी असावी यासाठी अांतरराष्ट्रीय स्तरावर ठरवलेल्या मानांकनावर राज्यातील उमेदवार तयार व्हावेत. त्यादृष्टीने त्यांना तत्सम प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार अाहे. या माध्यमातून मुंबई तसेच राज्यातील तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना परदेशातील कंपन्यांच्या गरजांनुरूप काैशल्य िनपुण बनवण्यात येणार असल्याचे काैशल्य विकास मंत्री संभाजी पाटील - िनलंगेकर यांनी िदव्य मराठीशी बाेलताना सांिगतले.

राज्यातील बेराेजगारांचे िशक्षण कमी असले तरी त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची काैशल्ये असतात. परंतु त्यांच्या कमी िशक्षणाचा फायदा घेत नाेकरी देणाऱ्या बाेगस संस्थांकडून या उमेदवारांची मानसिक तसेच अार्थिक फसवणूक केली जाते. विदेशात चांगल्या पगाराची नाेकरी िमळणार या अाशेने अनेक तरुण एजंटकडे लाखाे रुपये भरून परदेशात जातात. मात्र, तिथे गेल्यानंतर हमाली, झाडलाेट या सारखी कामे करावी लागल्याचे प्रकार अनेक उमेदवारांबाबत घडतात. यातून तरुणांना वाचवण्यासाठी काैशल्य विकास, राेजगार, स्वयंराेजगार क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ एका छताखाली अाणण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात ३५ लाख बेराेजगार
राज्यात जवळपास ३५ लाख बेराेजगार असून त्यांच्याकडील काैशल्याचा अाता अभ्यास करण्यात येत अाहे. विदेशी कंपन्यांना अपेक्षित मनुष्यबळ अाणि काैशल्य लक्षात घेऊन प्रसंगी या उमेदवारांच्या काैशल्यात वाढ केली जाईल. या उमेदवारांची सर्व माहिती एकाच िठकाणी उपलब्ध झाल्यामुळे कंपन्यांना हव्या असलेल्या क्षेत्रातील मनुष्यबळ उपलब्ध हाेण्यास मदत हाेईल. मुख्य म्हणजे सरकारकडूनच नाेकरीची संधी िमळत असल्यामुळे या उमेदवारांना अापल्यामागे नैतिक पाठबळ असल्याचे समाधान वाटेल, असेही िनलंगेकर म्हणाले.
संकेतस्थळ अद्ययावत हाेणार
राज्य सरकारची काैशल्य विकास, राेजगार, स्वयंराेजगार अशी तीन संकेतस्थळे अाहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार या ितन्ही संकेतस्थळांच्या एेवजी एकच संकेतस्थळ तयार करण्यात येणार असून त्याची प्रक्रिया सुरू झाली अाहे. या संकेतस्थळावरील उमेदवारांची माहिती तपासून त्याप्रमाणे विदेशातील नाेकरीची संधी िमळू शकेल.
बातम्या आणखी आहेत...