आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी राष्ट्रपतींच्या मुलीच्या ट्रस्टला दिली अत्यल्प दराने सरकारी जमीन, कॅगची नापसंती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची मुलगी ज्योती राठोड यांच्या “महाराष्ट्र महिला उद्यम ट्रस्ट’ या सार्वजनिक संस्थेस नियमांना फाटा देऊन अत्यंत कवडीमोल दराने पुणे जिल्ह्यातील अत्यंत महागडी अशी आठ हेक्टर जमीन दिल्याप्रकरणी लोकलेखा समितीने आपल्या अहवालात तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.   
 
लोकलेखा समितीचा २०१५-१६ वर्षाचा अहवाल नुकत्याच संपलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आला. त्यामध्ये प्रतिभा पाटील यांच्या मुलीच्या ट्रस्टला जमीन देताना नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.   
 
या अहवालात लोकलेखा समितीने बेकायदेशीरपणे जमीन वाटप करणाऱ्या पुणे जिल्हाधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली आहे. कोणत्या नियमांच्या आधारे आपण ट्रस्टला जमीन वाटप केली, याचा खुलासा समितीने विभागीय सचिवांकडे केला. त्याला उत्तर देताना सचिवांनी मंत्रालयास लागलेल्या आगीत  नस्ती (फाइल) जळाली असल्याची साक्ष समितीसमोर दिल्याचे म्हटले आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात जांबे गावी ८ हेक्टरची जमीन या ट्रस्टला दिली होती. या भूखंडावर शाळा, महाविद्यालय, वसतिगृह, मैदान आदी बांधले जाणार होते. केवळ १ रुपया नाममात्र दराने ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने ही जमीन २००९ मध्ये देण्यात आली होती.   

अपात्र असताना जमीन
‘कॅग’ने जेव्हा या प्रकरणाची तपासणी केली, तेव्हा प्रतिभाताई यांची मुलगी ज्योती राठोड यांची संस्था भाडेपट्ट्याने जमीन देण्याप्रकरणी अपात्र होती. या संस्थेकडे आवश्यक ते भांडवल नव्हते, तरीसुद्धा राज्य सरकारने बेकायदा पद्घतीने जमीन वाटप केले, असे मत ‘कॅग’ने अहवालात पूर्वीच नोंदवलेले होते.  
बातम्या आणखी आहेत...