आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Govt Decided To Take Test To Know Tend Of School Chiildrens

दहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी, आठ भाषांचा पर्याय, डिसेंबरपूर्वी प्रक्रिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक फोटो. - Divya Marathi
प्रतिकात्मक फोटो.
मुंबई - यंदाच्या वर्षी दहावीत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची अाॅनलाइन कलमापन चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीबाबतचा नियोजनबद्ध आराखडा तत्काळ तयार करण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आठ भाषांमध्ये ही चाचणी करण्यात येणार असून डिसेंबरपूर्वीच ही चाचणी पूर्ण करून विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न शालेय शिक्षण विभाग करणार आहे, अशी माहिती तावडे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

कलमापन चाचणी संदर्भात व्यवसाय मार्गदर्शन संस्थेतील अधिकाऱ्यांसमवेतची बैठक मंगळवारी झाली. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. शिक्षणमंत्र्यांनी सांगितले, दहावीत असलेल्या विद्यार्थ्याला करिअर कोणत्या क्षेत्रात करायचे आहे याबाबत ही चाचणी मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे कलमापन चाचणीमुळे विद्यार्थ्यांमधील अभिरुची वाढविणे याबरोबरच त्याची क्षमता नेमक्या कोणत्या अभ्यासक्रमात आहे हे समजण्यास मदत होणार आहे.
अाॅनलाईन पद्धतीने घेण्यात येणारी ही चाचणी डिसेंबर २०१५ पूर्वी पूर्ण करण्यासाठी यासाठी आराखडा तयार करताना जिल्हानिहाय नियोजन करणे आवश्यक आहे. या चाचणीमध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा कल, गुणवत्ता आणि विकास याबाबींवर लक्ष केंद्रीत करावे, अशा सूचनाही शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिल्या.
अर्ज १० नाेव्हेंबरपर्यंत
मार्च २०१६ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्जाच्या मुदतीत वाढ करण्यात आली अाहे. आता नियमित शुल्कासह १० नोव्हेंबरपर्यंत, तर विलंब शुल्कासह १९ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत. सर्व विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरावयाचे आहेत. याअाधी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत होती.