आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपीटग्रस्तांना सरकारकडून तुटपुंजी मदत जाहीर, खडसेंची विधानसभेत घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- राज्यात अवकाळी पावसाने 35 हजार हेक्टर शेतीचे नुकसान केल्याने राज्य सरकारने गारपीटग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. मदत आणि पुनवर्सन मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत मदत जाहीर केली. त्यानुसार कोरडवाहू शेतक-यांना 10 हजार रूपये, बागायतीसाठी 15 हजार रूपये, तर फळबागांसाठी 25 हजार रूपये प्रति हेक्टरी मदतीची घोषणा खडसेंनी केली आहे. लाखो शेतक-यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे केवळ 10 ते 25 हजार रूपया पर्यंतची तुटपुंजी मदत सरकारने जाहीर केली आहे.
खाली वाचा, खडसेंनी झालेली केलेली मदत खालीलप्रमाणे...
- कोरडवाहू शेतक-यांना प्रति हेक्टरी 10 हजार रूपयांची मदत
- बागायती शेतक-यांना प्रति हेक्टरी 15 हजार रूपये पर हेक्टर मदत
- फळबागायदारांसाठी 25 हजार रूपये प्रति हेक्टर मदत
- शेतक-याचे पक्के घर पडले असेल तर 70 हजार रूपये मदत
- कच्चे घर पडले असेल तर 25 हजार रूपये मदत
- जमिन वाहून गेल्यास हेक्टरी 25 हजार रूपये मदत
- गारपीट व अवकाळी पावसात मृत्यू व्यक्तीस अडीच लाख रूपयांची मदत
- शेळी-मेंढी मृत झाल्यास साडेतीन हजार रूपये मदत
- म्हैस, बैल, जर्सी गाय मृत झाली असल्यास 25 हजार रूपयांची मदत