आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 कोटींची लाच देणा-या नगररचना अधिका-याची संपत्ती पाहून पोलिस चक्रावले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाच घेऊन कमाविलेल्या मायेचा उलगडा होऊ नये म्हणून 1 कोटींची लाच देऊ पाहणा-या वाय. शिवा रेड्डी या सरकारी अधिका-याला एसीबीने अटक केली आहे. - Divya Marathi
लाच घेऊन कमाविलेल्या मायेचा उलगडा होऊ नये म्हणून 1 कोटींची लाच देऊ पाहणा-या वाय. शिवा रेड्डी या सरकारी अधिका-याला एसीबीने अटक केली आहे.
मुंबई- लाच घेऊन कमाविलेल्या मायेचा उलगडा होऊ नये म्हणून 1 कोटींची लाच देऊ पाहणा-या एका सरकारी अधिका-याला एसीबीने अटक केली आहे. वाय. शिवा रेड्डी असे या अधिका-याचे नाव असून, तो वसई-विरार महानगरपालिकेतील नगररचना खात्याचा उपसंचालक पदावर कार्यरत आहे. रेड्डी याला एसीबीने मागील आठवड्यात अटक केली असून बुधवारी रेड्डीचे वसई विकास बॅंकेतील लॉकर उघडले असता त्यात 2 किलो सोने आणि 33 लाख रूपयांची रोखड मिळाली. रेड्डीला पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वाय. शिवा रेड्डी हा लाचखोर अधिकारी अनेक गैरव्यवहार करीत असल्याची तक्रारी होत्या.
शिवसेनेचे गटनेते धनंजय गावडे यांनी त्याचे गैरव्यवहार बाहेर काढण्यास सुरुवात केली. मात्र, आपले गैरव्यवहार बाहेर आणू नयेत यासाठी रेड्डीने गावडेंना सबुरीने घेण्याची विनंती केली. तसेच या बदल्यात आपण तुम्हाला 1 कोटी रूपये देऊ असे सांगितले. मात्र, गावडेंनी त्याची ऑफर नाकारत याची माहिती एसीबीला दिली. त्यानुसार मंगळवारी गावडेंना रोख 25 लाख रूपये देताना रेड्डीला एसीबीने रंगेहाथ पकडले.
रेड्डीची माया पाहून पोलिस चक्रावले-
नगररचना उपसंचालक म्हणून काम करताना रेड्डीने तुफान संपत्ती मिळविल्याचे स्पष्ट झाले आहे. रेड्डीचे मुंबई व वसई परिसरांत 4 कोटींचे 5 फ्लॅट आहेत. तिकडे हैदराबादमध्ये रेड्डीने कोट्यावधीची माया गोळा केल्याचे तपासात दिसून आले. एसीबीचे पथक रेड्डीच्या मूळ गावी व हैदराबादला गेले आहेत. रेड्डीच्या हैदराबादमधील बंगल्यात 91 लाख रूपयांची रोकड सापडली आहे. तसेच त्याच्या नावार हैदराबादमध्ये 1 मोठा बंगला, 10 फ्लॅट आहेत. याशिवाय जमिन व भूखंड असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पुढे आणखी पाहा व वाचा...
बातम्या आणखी आहेत...