आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Govt Plans Rs 90000 Crore Underground Ring Road For Mumbai

मुंबईला रिंग रोडने जोडण्याचा नितीन गडकरींचा मानस, 90 हजार कोटींचा प्रकल्प!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई शहरातील वाढती लोकसंख्या व वाढते महत्त्व पाहता केंद्र सरकारचा या शहराला जागतिक शहर बनविण्याचा मानस आहे. मुंबई-ठाणे शहर भुयारी रिंग मेट्रोने जोडण्याचा विचार केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी बोलून दाखविल्यावर आता संपूर्ण मुंबई-ठाणे शहरांलगत रिंग रोड बांधण्याची कल्पना केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मांडली आहे.
मोठमोठे रस्ते आणि चौकाचौकात उड्डाणपूल उभारून मुंबईच्या सौंदर्याला सिमेंटची बाधा झाली आहे. ती अधिक होऊ नये यासाठी भुयारी रिंग रोड बांधण्याची महत्त्वाकांक्षी योजना रस्ते वाहतूक मंत्रालय राबविण्याच्या विचाराधीन आहे. यासाठी सुमारे 90 हजार कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, गडकरींनी यातील बजेट कमीत कमी कसे करता येईल यावर काम सुरु केले आहे. विविध पातळ्यांवर काम केल्यास या रिंग रोडचा खर्च 90 वरून 60 हजार कोटींपर्यंत खाली आणता येऊ शकेल असे गडकरींचे म्हणणे आहे. मुंबई व ठाणे शहरे रिंग रोडने जोडल्यास अहमदाबाद, पुणे व कोकणाकडे जाणारी वाहतूक अधिक सुरळित होणार आहे.
मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. तसेच जगातील एक मोठे शहर म्हणून उद्यास येत आहे. मात्र, इतर देशातील मोठ्या शहरांकडे पाहिल्यास मुंबई अधिक बकाल असल्याचे दिसून येते. मुंबईची खरी समस्या लोकसंख्या व त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक व्यवस्था आहे. मुंबईला जागतिक शहर बनवायचे असल्यास मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बेस्ट) लोकल रेल्वे, मेट्रो आदी सेवा उच्च दर्जाच्या देण्याबरोबरच चौकाचौकात होणारी गर्दी रोखण्यासाठी उड्डाणपूल बांधणे, रस्ते विकास करणे, रिंग रोड आदी पर्यायाची नितांत गरज आहे. त्यानुसार केंद्राने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे.
केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी मुंबई शहराला रिंग मेट्रोने जोडण्याबाबत केंद्र विचार करेल असे म्हटले होते. आता नितीन गडकरींनीही मुंबई शहर रिंग रोडने जोडण्याचा विचार पुढे आणला आहे.
पुढे वाचा, कसा असेल मुंबईतील रिंग रोड आणि नितीन गडकरींनी काय म्हटले आहे मुंबई रिंग रोडबाबत....