आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Govt S R Day Ad Omits Socialist Secular From Preamble

धर्मनिरपेक्ष शब्द घटनेतून कायमचा वगळा, केंद्र सरकारच्या जाहीरातीचे शिवसेनेकडून समर्थन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीवरून वाद निर्माण झाला असतानाच, या वादात शिवसेनेनेही उडी घेतली असून राज्यघटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द कायमचे वगळावे, अशी मागणी शिवसेनेने बुधवारी केली.
केंद्राच्या जाहिरातीत घटनेच्या सरनाम्याचे ४२ व्या घटनादुरुस्तीपूर्वीचे चित्र होते. त्यात ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे दोन शब्द नव्हते. त्यावरून मंगळवारी राजकीय पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली.
शिवसेनेनेही बुधवारी या वादात उडी घेतली. पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत म्हणाले की, प्रजासत्ताक दिनाच्या जाहिरातीतून हे शब्द वगळल्याचे आम्ही स्वागत करतो. ते कदाचित अनवधानाने झाले असले तरी भारतातील लोकांच्या भावनेचा सन्मान करण्यासारखे आहे. या वेळी जरी चुकीने हे शब्द वगळले गेले असले तरी ते घटनेतून कायमचे वगळण्यात यावेत. जेव्हापासून हे दोन्ही शब्द घटनेत समाविष्ट झाले तेव्हापासूनच हा देश कधीही धर्मनिरपेक्ष असू शकणार नाही, असे म्हटले गेलेे. बाळासाहेब ठाकरे व त्यापूर्वीही स्वातंत्र्यवीर सावरकर हेही ‘भारताचे विभाजन धर्माच्या नावावर झाले आहे, पाकिस्तान मुस्लिमांसाठी निर्माण झाला. मग उरलेले हिंदू राष्ट्र आहे,’ असे म्हणत होते, असे राऊत म्हणाले.
अल्पसंख्याक समुदायाचा वापर फक्त राजकीय लाभासाठी करण्यात आला, तर हिंदूंचा कायम अपमान करण्यात आला. हिंदंूना अशी वागणूक मिळावी आणि मुस्लिमांचा वापर फक्त मते मिळवण्यासाठी करावा असे घटनेत कुठेही लिहिलेले नाही, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, नागपुरातही राऊत यांनी याच भूमिकेचा पुनरुच्चार केला. ओबामांचा अमेरिका, इंग्लंड ही ख्रिश्चन राष्ट्रे आहेत. काही राष्ट्रे स्वत:ला मुस्लिम, बौद्ध राष्ट्र म्हणवतात. मग भारतच निधर्मी कसा, असा सवाल खासदार राऊत यांनी उपस्थित केला.

ओबामांना मोदींचे रंग कळले-
ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खरे रंग ओळखले हे बरेच झाले, अशी टीका विरोधकांनी केली आहे. मोदींनी आता तरी आत्मपरीक्षण करावे, असे काँग्रेसने म्हटले आहे. धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा भाजपचा अजेंडा जागतिक चिंतेचा विषय बनला, असे बसप नेत्या मायावती म्हणाल्या. ओबामांनी मोदी राजवटीतील वाढती असहिष्णुता अधोरेखित केल्याचे आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी म्हटले आहे.
पुढे वाचा, राजकीय विश्लेषकांचे व विरोधी पक्षांचे काय म्हणणे आहे ते...