आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंचपद निवडणुकीत भाजप, काँग्रेसचे पुन्हा ‘नंबर वन’चे दावे; विदर्भात मुख्यमंत्र्यांना धक्का

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील १८ जिल्ह्यांमधील ३,६६६ ग्रामपंचायंतीसाठी झालेल्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्याचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात अाला. पहिल्या टप्प्याप्रमाणे याही निकालात अामचेच सर्वाधिक सरपंच निवडून अाले, असा दावा भाजपने केला अाहे. तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने मात्र हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.  पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातही प्रत्येकी एक हजारहून ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवून अामचाच पक्ष माेठा ठरल्याचा दावा काँग्रेसनेही केला अाहे.   

दुसऱ्या टप्प्यात ४११९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होणार होत्या; परंतु काही ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणुका झाल्याने फक्त ३६६६ ग्रामपंचायतींसाठीच साेमवारी मतदान घेण्यात अाले. त्याचे निकाल मंगळवारी जाहीर झाले.   

भाजपने केलेल्या दाव्यानुसार, त्यांना १३११ जागी विजय प्राप्त झाला आहे. तर  शिवसेना २९५, कांॅग्रेस ३१२ आणि राष्ट्रवादीला २९७ ठिकाणी विजयी झाले आहेत. भंडारा जिल्ह्यात १९१, गोंदिया १४७, सिंधुदुर्ग ७०, रत्नागिरी ४७, अमरावती १५०, वर्धा ५६, नागपूर १२६. चंद्रपूर २८ आणि पुण्यातील २४ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला असल्याचा भाजपचा दावा अाहे.

विदर्भात मुख्यमंत्र्यांना धक्का 
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दत्तक घेतलेल्या अनुक्रमे फेटरी व सुरादेवी या गावांमध्ये भाजपला जोरदार धक्का बसला. या गावांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार सरपंचपदी मोठ्या मतफरकाने निवडून आले आहेत.
बातम्या आणखी आहेत...