आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरित पट्टय़ाची माहिती आता ऑनलाइन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बेसुमार वृक्षतोडीमुळे राज्यातील हरित पट्टा कमी होत असल्याची टीका झाल्याने आता राज्य सरकारने जीपीएस सुविधेच्या माध्यमातून वृक्ष लागवडीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न ऑनलाईन दाखवण्यासाठी पावले उचलली आहेत. यापुढे राज्याच्या कोणत्याही भागात लावली जाणारी झाडे, त्यांच्या वेळ, तारखा आणि फोटो ऑनलाईन उपलब्ध होतील. मुख्य सचिव जे. के. बांठिया यांच्याकडे हरित पट्टा वाढवण्याविषयी या आठवड्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

ही वेबसाइट महिन्याभरात सुरू होणार असून ती जनतेसाठी खुली राहणार असून वृक्ष लागवड, संवर्धनाच्या सर्व प्रयत्नांची माहिती ऑनलाईन उपलब्ध होईल. एखाद्या भागातील हरित पट्टा कमी होत असल्यास त्यावर जनतेचच लक्ष राहू शकेल.

20 कोटी नवी झाडे - वने, ग्रामविकास विभागाने गेली दोन वर्षे वृक्ष लागवडीसाठी काही योजना राबवल्या आहेत. त्यातील वने विभागाने गेल्या वर्षभरात 7.4 कोटी झाडे लावली असून या वर्षी 20 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वृक्षलागवडीवर भर देण्यात येणार असल्याचेही अधिकार्‍याने सांगितले.