आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: विरारमध्ये दहावीच्या मुलीवर चाकू हल्ला, हल्लेखोर फरार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ठाणे जिल्ह्यातील विरार (पूर्व) येथील नाना नानी पार्क परिसरात राहणा-या एका मुलीवर चार-पाच जणांच्या टोळ्याने चाकू हल्ला केला. संबंधित मुलगी इयत्ता दहावीत असून, ती सकाळी साडेसहाच्या सुमारास शाळेत जात होती. त्यावेळी तिच्या मागावर असणा-या या टोळक्याने अचानक तिच्यावर हल्ला केला. या मुलीवर सध्या उपचार सुरु आहेत. काही दिवसापूर्वी या मुलीने छेड काढल्याप्रकरणी एका मुलाच्या कानाखाली लगावली होती. त्यातूनच संबंधित मुलाने मित्राच्या मदतीने हे कृत्य केल्याचे मुलीच्या आईने सांगितले.
विरारमधील नाना नानी पार्कमध्ये राहणारी ही मुलगी आज सकाळी नेहमीप्रमाणे साडेसहाच्या सुमारास शाळेत चालली होती. त्यावेळी तबा धरून बसलेल्या व तिचा पाठलाग करणा-या चार-पाच जणाच्या टोळक्याने काही कळायच्या आतच तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर ते लागलीच तेथून फरार झाले. मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली आहे. तसेच हल्ला करणा-या संशयित मुलांची नावे सांगितली आहेत. पोलिस पुढील तपास करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...