आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुजोर पोलिस कॉन्स्टेबलने पायाने तुडवला तिरंगा, संतप्त लोकांचे मुलुंड स्टेशनवर आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- स्वातंत्र्य दिनीच्या पूर्वसंध्येला गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस दलाच्या (जीआरपी) एका कॉन्स्टेबलवर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याची घटना समोर आली आहे. कॉन्स्टेबलने जाणूनबुजून तिरंग्यावर पाय ठेवल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शीने केला आहे. ही घटन मुलुंड रेल्वे स्टेशनवर घडली. या घटनेनंतर हजारो लोकांनी रेल्वे रुळावर उभे राहून आंदोलन केले. जीआरपीने या प्रकरणीची सखोल चौकशी सुरु केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत कॉन्स्टेबलवर निलंब‍नाची कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे हे प्रकरण?
- मिळालेली माहिती अशी की, 14 ऑगस्टला रात्री 8:30 वाजता एक महिला मुलुंड स्टेशनवर तिकीट काऊंटरजवळ एक महिला तिरंगा झेंडा आणि बॅच विक्री करत होती. तितक्यात मुलुंड रेल्वे स्टेशनवर तैनात कॉन्स्टेबल राधेश्याम यादव हा तिथे आला आणि त्याने तिला हटकले.
- महिला आपला सामानाची आवराआवर करत असताना कॉन्स्टेबलने तिला शिविगाळ करण्‍यास सुरुवात केली. झेंडे आणि बॅच ठेवलेल्या बॉक्सला पायाने तुडवले.   
- एक प्रवासी बाजुला उभा राहून सर्व प्रकार पाहात होता. त्याने प्रसंगाचे गांर्भीय लक्षात घेत तो महिलेच्या मदतीला धावून गेला. त्यालाही कॉन्स्टेबलने शिविगाळ केली.
- त्यावर तो संतापला आणि कॉन्स्टेबलच्या ‍विरोधात त्याने जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली.
- नंतर पाहाता पाहाता तिथे हजारो नागरिक एकत्र आले. त्यांनी रेल्वे रुळावर उतरुण आंदोलन सुरु केले.

चौकशीपर्यंत कॉन्स्टेबल निलंबित..
- संतप्त नागरिकांनी कॉन्स्टेबलला धक्काबुक्की केली. मुलुंड जीआरपीने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
- आरोपी कॉन्स्टेबलला अटक करण्याची त्यांनी मागणी लावून धरली. नागरिकांनी तब्बल अर्धा ते पाऊण तास धरणे आंदोलन केले.
- या आंदोलनामुळे लोकलच्या वाहतुकीवरही परिणाम झाला होता.
- जीआरपीने कॉन्स्टेबलच्या चौकशीचे आदेश दिले आहे. चौकशी सुरु असेपर्यंत आरोपीला निलंबित करण्‍यात आले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा.. संबंधित घटनेचे फोटो आणि व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...