आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधिमंडळात जीएसटी विधेयक एकमताने मंजूर, वाचा.. काय स्वस्त होणार, काय महागणार?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीएसटी विधेयक मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे आभार मानले. देशात 1 जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार आहे. - Divya Marathi
जीएसटी विधेयक मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे आभार मानले. देशात 1 जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार आहे.
मुंबई - जीएसटी लागू झाल्यानंतर राज्याच्या उत्पन्नात दोन टक्क्यांनी वाढ होऊन ५० हजार कोटींनी महसूल वाढेल. जीएसटीच्या अंमलबजावणीने महागाई कमी होईल, असे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जीएसटीवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना विधानसभेत सोमवारी दिले. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सोमवारी विधेयक क्रमांक ३३ महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले.

अर्थमंत्री म्हणाले, एलबीटी आणि व्हॅट रद्द झाल्यामुळे सरकारचे होणारे नुकसान केंद्र सरकार भरून देईल. जीएसटी लागू झाल्यानंतर जुन्या कराचे दायित्व संपुष्टात येणार नसून महसूल, विक्रीकर, विद्युत अशा विविध विभागांकडून येणारी थकबाकी राज्य सरकार वसूल करणारच आहे. यासाठी राज्य सरकारकडून लवाद नेमूनही थकीत कराची वसुली केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी आम्ही सकारात्मक
जादूच्या कांडीसारखे दोन-अडीच वर्षांत राज्याचे प्रश्न सुटणार नाहीत. यासाठी ५ वर्षे लागतील. आम्ही शेतकरी कर्जमाफीस सकारात्मक  आहोत.योग्य वेळी त्याचा निर्णय घेऊ. राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा आहे.
- सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री, महाराष्ट्र
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, कोणत्‍या वस्‍तूवर किती सेवा कर लागणार...
 
हेही वाचा...
> GST नुसार करांचे दर निश्चित: व्हॅट रद्द झाल्याने धान्य स्वस्त, चहा-कॉफीवर 13% कर कमी, कार स्वस्त होणार

> Alto, Kwid आणि Swift अशा छोट्या गाड्या महागणार, सर्व प्रकारच्या कारवर 28% युनिफॉर्म टॅक्स

> जीएसटी : आयात वस्तू महागल्याने देशांतर्गत उद्योगाला फायदा,5 % व्यावसायिकांची तपासणी

> व्यापारी-ग्राहकांसाठीही जीएसटी करपद्धती सुलभ; अधीक्षक दीपक गुप्ता यांचे चर्चासत्रात प्रतिपादन

> जीएसटी लागू झाल्यानंतर वस्तू होतील स्वस्त, तर सेवा महागणार : जेटली

> जीएसटी: दरमहा अपलोड करावेच लागतील व्यवहार, संगणक साक्षर अकाउंटंटची मोठी गरज भासणार

> जीएसटी: भेट, चोरी, नष्ट वस्तूंचीही लागेल नोंद; उत्पादन, विक्री अन् सेवा सर्वांसाठी स्वतंत्र नोंद

> जीएसटी विधेयके लोकसभेत पारित; महागाई वाढणार नाही : अरुण जेटली
बातम्या आणखी आहेत...