आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'रायन इंटरनॅशनल स्कूल\'चे सीईओ रायन पिंटोंचा मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई हायकोर्ट. - Divya Marathi
मुंबई हायकोर्ट.
मुंबई- 'रायन इंटरनॅशनल स्कूल'चे सीईओ रायन पिंटोंचा मुंबई हाय कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गुरूग्राम येथे रेयान इंटरनॅशनल शाळेत 7 वर्षाच्या चिमुकल्याच्या खून करण्यात आला होता. हा खून याच शाळेतील एका कंडक्टरने केल्याचे उघड झाले होते. त्यानंतर 'रायन इंटरनॅशनल स्कूल'चे सीईओ रायन पिंटो यांनी अटक होण्याची शक्यता असल्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.​
 
प्रद्युम्नचे वडील सुप्रीम कोर्टात 
रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये हत्या झालेल्या प्रद्युम्न ठाकूर (वय 7) च्या आईने आत्महत्येचा इशारा दिला आहे. प्रद्युम्नच्या खऱ्या मारेकऱ्यांना पकडले नाही, तर आत्महत्या करेन, असा इशारा प्रद्युम्नच्या आईने दिला आहे. तर प्रद्युम्नचे वडील या प्रकरणाची दाद सुप्रीम कोर्टात मागणार आहेत.
 
अशोकच्या बचावासाठी बहिण आणि वडिल
शुक्रवारी 8 सप्टेंबर रोजी प्रद्युम्नचा मृतदेह शाळेच्या शौचालयात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सापडला होता. या प्रकरणी शाळेच्या बस कंडक्टरला अटक करण्यात आली आहे. पण या हत्येमागे कंडक्टर नसावा, कोणी अन्य यामागे आहे, असा आरोप प्रद्युम्नच्या आईने केला आहे. पोलिस कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. खरा आरोपी पकडला न गेल्यास आत्मदहनाचा इशारा प्रद्युम्नच्या आईने दिला आहे. आरोपी बसवाहक अशोक असे कृत्य करूच शकत नाही, अशी वाजू त्याच्या वडिलांनी आणि बहिणीने मांडली आहे. त्याच्याकडे चाकूही नव्हता, असे त्यांचे म्हणणे आहे.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 
 
 
बातम्या आणखी आहेत...