आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'Gudi Padwa\' Being Celebrated In Maharashtra On The Occasion Of Hindu New Year.

मराठी नववर्षाचे सर्वत्र जोरदार स्वागत, शोभायात्रांनी रस्ते फुलले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यात मराठी नववर्षाचे जोरदार स्वागत करण्यात आले. मुंबई व उपनगरासह पुणे, औरंगाबाद, नागपूरसह सर्वत्र उत्साहात गुढी पाडवा साजरा करण्यात आला. रांगोळी, प्रत्येक दारावर गुढी व गोड नौवेद्याचा आरास असे सार्वत्रिक दिसत होते.
राज्यातील वेगवेगळ्या शहरात स्थानिक नेत्यांनी आपापल्या भागात शोभायात्रा काढल्या. ढोल ताशांचा गजर, लेझिम पथके व पारंपारिक पद्धतीने साडी नेसून, नाकात नथ घालून महिलांनी यात रंग भरला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मराठी वस्ती असलेल्या गिरगावात शोभायात्रा काढण्यात आली. फडके गणेश मंदिरापासून ही भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेसाठी 20 फूट भारतमातेची प्रतिमा रथावर विराजमान झाली होती. तसेच 18 फूट महिषासूरमर्दिनीची प्रतिमा उभारण्यात आली होती. या शोभयात्रेत हजार ते दीड हजार तरूण-तरूणी ढोलताशांचा गजर करीत होती. तिकडे उपनगर कल्याण-डोंबिवलीतही मराठी नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात आली. डोंबिवलीतही रस्त्यावर भव्य अशा रांगोळ्या पाहायला मिळाल्या. ठाण्याच्या गावदेवी मैदानावर संस्कार भारतीतर्फे शंभर फुटांची भव्य रांगोळी काढण्यात आली होती.
पुण्यातील कोथरूड व डेक्कन परिसरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. स्थानिक आमदार मेधा कुलकर्णी यांनी त्यात सहभाग घेतला. नागपूरमध्येही भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
पुढे पाहा, राज्यातील विविध भागातील शोभायात्रांची छायाचित्रे...