आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊन देशात दीर्घकाळ सेवा देणाऱ्या डॉ. रखमाबाई राऊत यांचा गुगलकडून सन्मान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन भारतात परतलेल्या पहिल्या मराठी महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई जोशी यांची ओळख. पण अकाली निधनाने देशवासीयांना त्यांच्या ज्ञानाचा फायदा झाला नाही. त्यांच्यानंतर विदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊन देशात दीर्घकाळ सेवा देणाऱ्या डॉ. रखमाबाई राऊत या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. त्यांच्या वैद्यकीय सेवेची दखल घेऊन गुगलने रखमाबाईंच्या १५३ व्या जयंतीचे औचित्य साधत डुडल तयार केले आहे. 


रखमाबाई यांचा जन्म २२ नोव्हेंबर १८६४ रोजी झाला. आनंदीबाईंपेक्षा त्या एक वर्षांनी मोठ्या होत्या. आनंदीबाईंच्या निधनानंतर (२६ फेब्रुवारी १८८७) तीन वर्षांनी म्हणजे १८९० मध्ये रखमाबाईंना इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ मेडिसीन फॉर वुमेनमध्ये प्रवेश मिळाला. चार वर्षे त्यांनी दंतशास्त्र, सुईणपण, भूलतंत्र तसेच स्त्रीरोग चिकित्सा आदींचा अभ्यास केला. लंडन स्कूल ऑफ मेडिसीन या परीक्षेत प्रसूतिशास्त्र विषयात विशेष प्रावीण्य मिळवले. जुलै १८९४ मध्ये रखमाबाईंनी वैद्यक व्यवसायाची शेवटची परीक्षा दिली. मुलींना पदवी देण्याची तरतूद त्या विद्यापीठाच्या कायद्यात नसल्याने रखमाबाईंनी शेवटची परीक्षा स्कॉटलंडच्या संस्थेत दिली. त्या उत्तीर्ण झाल्या आणि ‘लिसेन्शिएट ऑफ द रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन’ ही पदवी मिळाली. त्यांचे नाव इंग्लंडच्या `मेडिकल रजिस्टर’मध्ये दाखल झाले. नंतर त्या भारतात परतल्या. 


महिलांनी रुग्णालयाकडे यावे म्हणून शेळीची प्रसूती
रखमाबाईंना शिक्षणासाठी डफरिन फंडाने मदत केली होती. या फंडातर्फे देशात त्यावेळी सात रुग्णालये सुरू केली गेली. त्यातील एक मुंबईचे कामा रुग्णालय. येथे त्यांनी सहा महिने काम केले. यानंतर रखमाबाईंची सुरतच्या शेठ मोरारदास व्रजभूषणदास माळवी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली. या काळात महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात येत नसत. महिलांना रुग्णालयाकडे वळवण्यासाठी रखमाबाईंनी शेळीचे सुखरुप बाळंतपण केले. 

बातम्या आणखी आहेत...