आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gujarat CM Narendra Modi In Mumbai For BJP Meeting

नरेंद्र मोदी मुंबई दौर्‍यावर; भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठकीला नितीन गडकरींची दांडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नरेंद्र मोदी आज (गुरुवारी) मुंबई दौर्‍यावर आले आहेत. मोदींच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे येथील रंगशारदा हॉलमध्ये भाजपच्या कोअर ग्रुपची बैठक झाली. परंतु भाजपच्या या महत्त्वपूर्ण बैठकीला पक्षाचे माजी राष्‍ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी अनुपस्थीत राहिल्याने उलटसूलट चर्चा सुरु झाली आहे.

भाजपचे महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रूडी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांच्यासह ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हेही या बैठकीला उपस्थित होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचारप्रमुखपदाची जबाबदारी नरेंद्र मोदींवर सोपवण्यात आली आहे. त्यानंतर प्रथमच भाजपच्या कोअर ग्रुपची बैठक पार पडली आहे.

नितीन गडकरी यांच्या अनुपस्थितीतच राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीचे नियोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश शाखेतर्फे ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी सांगितले, की नरेंद्र मोदी प्रत्येक राज्यात जाऊन आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही आजची बैठक होती. जावडेकर यांच्या मते भाजप यावेळी मुंबई, पुणे आणि मराठवाड्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे.

दरम्यान, राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यापैकी भारतीय जनता पक्षाने लढवलेल्या 25 जागांपैकी फक्त 9 जागा त्यांना जिंकता आल्या होत्या. त्यापूर्वी म्हणजे 2004 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यातल्या 48 जागांपैकी 26 लढवल्या होत्या. त्यापैकी 13 जागांवर भाजप उमेदवारांनी विजय मिळवला होता. 2004 च्या तुलनेत 2009 मध्ये भाजपला राज्यात चार जागांचा फटका बसला होता.

पुढील स्लाइडवर वाचा... 'नितीन गडकरींची दांडी'