आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरातेत माेठी संधी, गुंतवणूक करा : रुपानी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘इझ अाॅफ डुईंग’वर अधिकाधिक भर देऊन गुजराातमध्ये अधिक गुंतवणूक अाकर्षित करण्याकडे जास्त लक्ष पुरविण्यात येत अाहे. त्यासाठी संरक्षण, जैवतंत्रज्ञान, कृषी प्रक्रिया, बंदर विकास अाणि वाहन क्षेत्रात गुंतवणूक करावी असे अावाहन गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मंगळवारी मुंबई व महाराष्ट्रातील उद्याेजकांना केले. ‘उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्याबराेबरच गुंतवणुकदारांसाठी पुरेशा सुविधा पुरवणे अाणि इझ अाॅफ डुईंग प्रक्रिया अाणखी गतिमान करण्यावर गुजरात राज्यात भर देण्याची हमी अाम्ही देशातील अव्वल उद्याेजक अाणि व्यावसायिकांना िदली अाहे. केंद्र सरकारने राबविलेल्या धाेरणांमुळे देशातील कंपन्या समाधानी असल्यामुळे राज्याच्या अार्थिक वाढीसाठी अधिकाधिक गुंतवणूक अाकर्षित करण्यात येईल,’ असा विश्वास रुपानी यांनी व्यक्त केला. गुजरातमधील गांधीनगर येथे १० ते १३ जानेवारी दरम्यान हाेत असलेल्या ‘व्हायब्रंट गुजरात’ परिषदेच्या निमित्ताने मंगळवारी मुंबईत अायाेजित करण्यात अालेल्या राेडशाे निमित्त ते बाेलत हाेते.

संरक्षण अाणि हवाई ही अार्थक वाढीसाठी दाेन प्रमुख क्षेत्र असून त्यादृष्टीने राज्यात उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचा विचार अाहे. नाैका उभारणी, कृषी खाद्य प्रक्रिया, वस्त्र, हिरे या अन्य क्षेत्रांकडे देखील लक्ष पुरविण्यात येणार अाहे. जैव तंत्रज्ञान, अाराेग्य, संरक्षण, हवाई या क्षेत्रांसाठी येणा ऱ्या काही अाठवड्यात धाेरण जाहीर करण्याचे संकेतहीही रुपानी यांनी दिले. टाटा, फाेर्ड, हाेंडा टू व्हीलर, सुझुकी या कंपन्या राज्यात प्रकल्प उभारण्याचा विचार करत अाहेत. त्यामुळे गुजरात हे वाहन अाणि वाहनांच्या सुट्या भागांच्या उत्पादनाचे प्रमुख केंद्र ठरतअसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मुकेश अंबानी, अनिल अंबानी, रतन टाटा, अजय पिरामल, हर्ष गाेयंका, निरंजन हिरानंदानी, राणा कपूर, एनएसईच्या िचत्रा रामकृष्ण या उद्याेगपती अाणि व्यावसायिकांच्या भेटी घेऊन व्यवसायाच्या संधीबाबत चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...