आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरातचे विकासचित्र खोटे, उद्योगमंत्री नारायण राणेंनी सादर केली आकडेवारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र गुजरातपेक्षा सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचा दावा राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. राणे यांनी त्यांचे पुत्र आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश यांच्या वक्तव्याचेही समर्थन केले आहे. उद्योग, शिक्षण यांची आकडेवारी सादर करीत सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र पुढे असल्याचे सांगत, गुजरातचे रंगवले जाणारे विकासचित्र खोटे असल्याचे ते म्हणाले.

(विकासाच्या मॉडेलमध्ये कोण श्रेष्ठ )

नितेश यांनी गेल्या आठवड्यात गुजरात आणि नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात एक ट्विट केले होते. त्यामुळे राजकारण तापले होते. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी देखील ट्विट काय आहे, हे तपासले जाईल, असे सांगितले आहे. त्यानंतर आज (सोमवार) नारायण राणे यांनी नितेश यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. नितेश यांनी गुजराती आणि जैन समाजाबद्दल वक्तव्य केले नसल्याचे ते म्हणाले. भारतीय जनता पक्ष जो खोटा प्रचार करीत आहे, त्याबद्दलचे नितेश यांचे वक्तव्य असल्याचे राणे यांनी सांगितले.

गुजरातचे दावे पोकळ
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील गुजरातच्या प्रगती आणि विकासाचे दावेही नारायण राणे यांनी आकडेवारीसह खोडून काढले. महाराष्ट्रामध्ये 2012-13 मध्ये तब्बल 20,513 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून गुजरातमध्ये केवळ 3,817 कोटींची गुंतवणूक झाल्याचे आर्थिक सर्वेक्षणातून पुढे आले आहे. स्थूल उत्पन्न महाराष्ट्रात 11,99,547 तर गुजरातमध्ये 6,11,767 एवढे आहे. आपल्याकडे साक्षरतेचे प्रमाण 82.91 तर गुजरातमध्ये 79.31 एवढे आहे. मानव विकास निर्देशांक महाराष्ट्रात 0.572 तर गुजरातचा 0.527 असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे गुजरातच्या विकासाचे दावे पोकळ असून फडणवीसांसारखे नेते गुजरात सांभाळतात की महाराष्ट्र असा प्रश्न पडल्याचे ते म्हणाले. मोदींच्या विकासकामांचा गवगवाच करण्यात आल्याचा आरोपही राणे यांनी केला.


भाजप नेत्यांवर टीका

गुजरातचा विकास झाला असे म्हणणारे, मोदींचे कौतूक करणा-यांना उद्देशून नितेश यांनी वक्तव्य केले आहे. गुजराती समाजाबद्दल ते बोलले नाही. एका महिन्यापूर्वी केलेल्या ट्विटच्या आता बातम्या कशा होतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

राज्यातील भाजप नेत्यांनी केवळ राजकारणासाठी हे प्रकरण सुरु केले आहे. मराठी माणासाविरोधात शपथपत्र दाखल करणारे किरीट सोमय्या यांची चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी केली. तसेच भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबई शाकाहारी करण्याचा घाट घातल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पुढील स्लाइडमध्ये, काय म्हणाले होते नितेश राणे