आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gujrat Riots Case : Criminal Ramesh Chandra Send To Jail Ramesh Chandra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरात दंगल प्रकरण: आरोपी रमेश चंद्राला पाठवा तुरूंगात, उच्च न्यायालयाचा आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गुजरात दंगलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी रमेश चंद्रा याला गुजरातच्या तुरुंगात पाठवण्याचे आदेश मंगळवारी पोलिसांना दिले आहेत. आरोपी रमेश सध्या नाशिकच्या तुरुंगात आहे.


रमेशने स्वत:ला महाराष्ट्रातून गुजरातला पाठवण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीत हा निर्णय देण्यात आला. सोमवारी न्यायमूर्ती एस.सी.धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती एस.बी.शुक्रे यांनी अधिकाºयांना भविष्यातही या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश दिले. गुजरातच्या दंगलीमध्ये 3 मार्च 2002 रोजी मध्य गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील राधनपूर गावात एका मुस्लिम महिलेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्या महिलेची आई, बहीण व तीन वर्षाच्या मुलाचीही हत्या केली होती. सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याची सुनावणी गुजरातऐवजी महाराष्ट्रातील न्यायालयात करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने 2008 मध्ये रमेशसह 11 लोकांना आरोपी ठरवले होते.


‘मी गुजरातचा आरोपी’
रमेशने उच्च न्यायालयात याचिका दाखल करत गुजरातच्या बडोदा येथील मध्यवर्ती कारागृहात पाठवण्याची मागणी केली होती. आपण महाराष्ट्राचे नव्हे तर गुजरात सरकारचे आरोपी असल्याचा त्याचा युक्तिवाद होता. उच्च न्यायालयाने 2010 मध्ये महाराष्ट्र सरकारला रमेशच्या याचिकेवर विचार करण्याचे निर्देश दिले होते, पण महानिरीक्षकांनी (तुरुंग) ही मागणी फेटाळली. त्यानंतर रमेशने याचिका दाखल केली होती.