आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाम अली यांच्या ठाण्यात होणाऱ्या कार्यक्रमावरून पुन्हा 'वाद'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे: पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. यंदा गुलाम अली यांचा कार्यक्रम ठाण्यात होणार आहे. ठाण्यातील संघर्ष प्रतिष्ठानतर्फे आयोजित ठाणे महोत्सवात गुलाम अलींच्या गझल गायनाच्या कार्यक्रम होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटरवरून दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच गुलाम अली यांच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आला होता. तर आता शिवसेनेकडून गुलाम अली यांना विरोध दर्शवत त्यांचा कार्यक्रम आम्ही उधळून लावू असा इशारा देण्यात आला आहे. गुलाम अली यांनी महाराष्ट्रात येऊन दाखवावे, असे आवाहन शिवसेनेतर्फे प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. ‘गुलाम अली यांचा इतका पुळका असल्यास त्यांच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी भारत-पाक सीमेवर शहिद झालेल्या जवानांच्या पत्नींचा हळदीकुंकू समारंभ ठेवावा’ असं आवाहनही सरनाईक यांनी केले आहे.
सरनाईकांच्या वक्तव्याला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'राज्य सरकारची जबाबदारी आहे. सुधींद्र कुलकर्णींचा कार्यक्रम ज्याप्रकारे झाला, त्याप्रमाणे हा कार्यक्रमही आम्ही पार पाडून दाखवू, शिवसेनेने कार्यक्रम उधळूनच दाखवावा, असे सांगत सरनाईक यांचे आवाहन आव्हाडांनी स्वीकारले आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, जितेंद्र आव्हाड यांचे ट्वीट ...