आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पिस्तूलासह बिबट्याच्या मागे धावत गिरीश महाजनांची \'स्टंटबाजी\', विरोधकांनी मागितला राजीनामा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- स्वसंरक्षणासाठी दिलेल्या बंदुकीचा गैरवापर करत वन्यजीव कायदयाचा भंग करणारे भाजपचे मंत्री गिरीष महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. गिरीश महाजन यांनी सोमवारी चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे परिसरात बिबट्याला ठार मारण्यासाठी कोणतेही सुरक्षा व्यवस्था नसताना पिस्तूल हातात घेऊन धावले होते. यानंतर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी महाजनांचा राजीनामा मागितला आहे. 

 

दरम्यान, आपण कोणतेही चुकीचे कृत्य केले नाही. या परिसरातील बिबट्या नरभक्षक असल्याने वन विभागाने बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिल्यानंतरच आपण हे कृत्य केले आहे. मागील काही महिन्यांत नरभक्षक बिबट्याने चाळीसगावात 5 बळी घेतले आहेत. यात बळी गेलेल्या मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी वरखेडे शिवारात गेलो असतानाच तेथे बिबट्या दिसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यानंतर मी वन विभागाच्या पथकासोबत शेतात पायी चालले. माझ्यासोबत पुरेशी सुरक्षा व्यवस्था होती. ग्रामस्थ अडचणीत असताना आणि यापूर्वी 5 नाहक बळी गेलेले असताना मी गाडीत बसून राहू शकत नाही. माझा स्वभाव तसा नाही. मी शाकाहारी व्यक्ती आहे. वन्यजीव व प्राणी-पक्षांवर प्रेम करणारा मी माणूस आहे पण नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिल्यानेच मला हे पाऊल उचलावे लागले असे स्पष्टीकरण महाजन यांनी दिले. 

 

काय आहे प्रकरण-


- चाळीसगावात मागील काही महिन्यापासून बिबट्याची मोठी दहशत आहे.
- हा बिबट्या नरभक्षक असून, तो फक्त माणसांवरच हल्ला करत आहे.
- गेल्या पाच महिन्यात पाच बळी या बिबट्याने घेतले आहेत.
- रविवारी वरखेडे परिसरात एका शेतात कापूस वेचत असलेल्या सुसाबाई भील नावाच्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. यात सुसाबाईचा जागीच मृत्यू झाला.
- ही घटना कळताच मंत्री गिरीश महाजन वरखेडे गावातील भील कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी गेले होते.
- मंत्री महोदय व त्यांचा ताफा तेथेच असताना ग्रामस्थांनी तेथे बिबट्या आल्याचे सांगितले.
- यानंतर महाजन यांनी वन विभागाच्या पथकाला बोलावून बिबट्याचे मागे पिस्तूल घेऊन धावले.
- महाजन स्वत: शेतात गेले व एका झाडाआड लपून बिबट्यावर पिस्तूल रोखले. मात्र, बिबट्या निसटून गेला.
- दरम्यान, महाजन यांच्या कृत्यानंतर विरोधकांनी त्यांच्याविरोधात मोहिम उघडली आहे.
- महाजन यांनी वन विभागाच्या कायद्याचे उल्लंगन केल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
- तसेच एखाद्या बिबट्याला मारण्याचे काम मंत्रीमहोदयाचे असते का? असाही प्रश्न या निमित्ताने विचारला जाऊ लागला आहे.
- गिरीश महाजन यांना चमकोगिरी करण्याची पूर्वीपासूनच सवय आहे असे आता बोलले जाऊ लागले आहे.
- गेल्या वर्षी ते एका शालेय कार्यक्रमात कमरेला पिस्तूल लावून गेले होते. तसेच कमरेला पिस्तूल लावूनच त्यांनी विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटली होती.
- याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाजन यांच्यावर मोठी टीका झाली होती व राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली होती.
- आता पुन्हा एकदा तसाच प्रकार समोर आला आहे. त्यामुळे महाजन यांच्या हिरोपंती स्टंटबाजीची चर्चा सुरू आहे.

 

झोपेतील महिलेल्या झोपेतून बिबट्याने उचलून नेले,नरभक्षक बिबट्याचा सहावा बळी-

 

वरखेडे (चाळीसगाव)- नरभक्षक बिबट्याच्या दहशतीचे सावट कायम असून तीन दिवसानंतर वरखेडे येथील तिसरा तर एकुणातील सहावा बळी बिबट्याने मंगळवारी पहाटे 3 च्या सुमारास घेतला. यामुळे परिसरातील नरभक्षक बिबट्याच्या भितीचा थरार कायम आहे.


वरखेडे खुर्द येथील यमुनाबाई दला तिरमली या 70 वर्षीय महिलेवर झोपेत असताना बिबट्या हल्ला करीत ठार केले. झोपडीत सावत्र  मुलगा, सुन नातवंडे ही झोपले होते. यमुनाबाई पहिल्या क्रमांकाने झोपली होती. यामुळे तिला लक्ष करीत तिच्यावर हल्ला केला व त्याने तिला ओढत नेले. घरातील इतर लोकांना जाग येत नाही तोवर महिलेचे डोके धड्डापासुन वेगळे झाले होते.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, गिरीश महाजन यांच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...