आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gundekar Elected As Chairman Of Vidroha Sahitya Sammelan

विद्रोही साहित्य संमेलन अध्यक्षपदी गुंदेकर यांची निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - परभणी येथे 8 ते 9 फेब्रुवारीदरम्यान होणार्‍या 12 व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लातूर येथील प्रा. श्रीराम गुंदेकर यांच्या नावाची घोषणा बुधवारी करण्यात आली. गुंदेकर राजर्षी शाहू महाविद्यालयात प्राध्यापक असून ‘उचल’, ‘लगाम’ असे त्यांचे कथा वाड्मय प्रकाशित आहे. महात्मा फुले विचार, वाड्मय आणि ग्रामीण साहित्य : प्रेरणा आणि प्रयोजन असे समीक्षा ग्रंथ आहेत. ढगाची तहान हा त्यांचा बाल कवितासंग्रह तर बळीबा पाटील, ढढ्ढाशास्त्री परान्ने, सत्यशोधकी निबंध असे ग्रंथ संपादित केले आहेत.