आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीचे मुख्‍य प्रवक्‍ते नवाब मलिक यांच्‍या सभेत झडल्या बंदुकीच्या फैरी, उपसल्या तलवारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर मंगळवारी चेंबूरच्या अणुशक्तिनगरमधील सभेत गोळीबार करण्यात आला. राष्ट्रवादीचेच माजी खासदार संजय दिना पाटील यांनी हा हल्ला केल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. मात्र मलिक यांच्या गुंडांनीच तलवारींनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता आपल्या सुरक्षा रक्षकांनी बंदूक काढली; पण फायरिंग केले नाही, असा प्रत्याराेप पाटील यांनी केला.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी अणुशक्तिनगर येथे राष्ट्रवादीने सभा आयोजित केली होती. या सभेत घुसून संजय पाटील व त्यांच्या गुंडांनी हल्ला केला. पाटील यांच्या दोन्ही हातात बंदुका होत्या. त्यांच्या गुंडांनी केलेल्या तलवार हल्ल्यात आपण जखमी झालो, असे मलिक म्हणाले. तशी तक्रारही मलिक यांनी चेंबूर पाेलिस ठाण्यात केली. मलिक व पाटील एकाच पक्षाचे नेते असले तरी त्यांच्यात विळ्या-भाेपळ्याचे ‘सख्य’ अाहे. अणुशक्तिनगर मतदारसंघातील वाॅर्ड क्रमांक १४१ व १४२ वरून मलिक व पाटील यांच्यात वाद आहे. हे वाॅर्ड आपल्या मतदारसंघात येतात, असे मलिक यांचे म्हणणे असून भांडुप मतदारसंघात या दोन्ही वाॅर्डांचा समावेश आहे, असा पाटील यांचा दावा आहे. ही सभा आपल्याला िवश्वासात न घेता बोलावल्याने पाटील यांंनी हल्ला केल्याची माहिती आहे.
संजय पाटील यांनी चढवला हल्ला : मलिक
सभा सुरू असताना अचानक संजय पाटील व त्यांचे गुंड सभेत आले. त्यांनी अापल्यावर बंदूक रोखून सभा बंद करण्याचा प्रयत्न केला. तर गुंडांनी मलिक यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता अापल्यावर तलवारीने हल्ला करण्यात अाला, असा अाराेप मलिक यांनी केला अाहे.
बातम्या आणखी आहेत...