आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामतांचा पुन्हा राजीनामा! पक्षातील युवा ब्रिगेडकडून अडथळ्यांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पक्षात सातत्याने होत असलेली काेंडी तसेच काम करताना युवा ब्रिगेडकडून होत असलेल्या अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी पक्षातील सर्वच पदांचा राजीनामा दिला अाहे. दरम्यान, काँग्रेसनेही कामत यांची बुधवारी गुजरातच्या प्रभारीपदावरून उचलबांगडी केली असून ही जबाबदारी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर सोपवली आहे.  
 
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याशी सातत्याने हाेणाऱ्या वादाला कंटाळून कामत यांनी पक्षाचा राजीनामा दिला हाेता. परंतु पक्षाचे ज्येष्ठ नेते असल्याने तेव्हा त्यांची मनधरणी करण्यात अाली हाेती. कामत यांच्यावर गुजरातच्या प्रभारी पदाची जबाबदारी साेपवण्यात अाली हाेती. मात्र, सूत्रांच्या मते,  राहुल गांधी टीमचे सदस्य भंवर जितेंद्र सिंग हे त्यांच्या कामात ढवळाढवळ करायचे. गुजरातशी संबंधित कुठलाही निर्णय घेण्याची कामत यांना मुभा नव्हती. पक्षाची सेवा केल्यानंतरही कामत यांना मिळणारी वागणूक अपमानास्पद हाेती. याच कारणांमुळे कामत यांनी पुन्हा एकदा काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. कामत केव्हाही पक्ष साेडू शकतात, अशी चर्चाही हाेती.  
 
याआधीही दिला होता राजीनामा
मुंबई महापालिका निवडणुकीमध्‍ये उमेदवार ठरवण्‍यावरुन कामत यांचा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्‍यासोबत वाद झाला होता. त्‍यावेळी गुरुदास कामत यांनी राजीनामा दिला होता. मात्र त्‍यावेळी त्‍यांची समजूत काढण्‍यात आली होती व त्‍यांनी राजीनामा मागे घेतला होता.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, गुजरात काँग्रेसमध्‍ये फेरबदल करण्‍यात आल्‍याचे पत्र
 
बातम्या आणखी आहेत...