आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरूदास कामतांच्या राजकीय संन्यासाने कार्यकर्ते सैरभैर, समर्थकांची घराबाहेर रांग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘आपण इतकी वर्षे मला साथ दिली, याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे’, असे भावनिक उद्गार कामत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत काढले. - Divya Marathi
‘आपण इतकी वर्षे मला साथ दिली, याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे’, असे भावनिक उद्गार कामत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत काढले.
मुंबई- माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेसचे मुंबईतील बडे नेते गुरुदास कामत यांनी सोमवारी रात्री काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबईतील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. कामत यांच्या घराबाहेर येऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी परत काँग्रेस पक्षात सक्रिय व्हावे अशी मागणी केली. कामत यांनी घेतलेला राजकीय संन्यास अयोग्य आहे त्यांनी पुन्हा पक्षात सक्रिय व्हावे, आम्ही सोनिया गांधी व राहुल गांधींना विनंती करतो की, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामत यांची पक्षाला फार गरज आहे. त्यांना पुन्हा सन्मानाने पक्षात पुन्हा सक्रिय होण्याची विनंती करावी अशी मागणी समर्थकांनी केली. दरम्यान, आपण राजकारणातून निवृत्त झालो आहे, समाजकारणातून नाही. सामान्यांसाठी आपण काम करीतच राहू असे स्पष्टीकरण कामत यांनी आपल्या समर्थकांना दिले.
44 वर्षे काँग्रेस पक्षात काम केलेले आणि पाच वेळा मुंबईतून लोकसभेवर निवडून गेलेल्या गुरुदास कामत यांनी सोमवारी राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यासोबतच त्यांनी काँग्रेसमधील सर्व पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले. कामत यांनी एवढा मोठा निर्णय घेताना आपल्या समर्थक कार्यकर्त्यांनाच सोडा पण बड्या नेत्यांना थांगपत्ता लागू दिला नाही. गुरुदास कामत सध्या पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस पदावर कार्यरत होते. तसेच त्यांच्याकडे गुजरात आणि जयपूर या राज्यांचे प्रभारीपद होते. मात्र, मुंबई काँग्रेसमधील घडामोडींना कामत यांना विचारात घेतले जात नव्हते.
राहुल गांधी यांनी संजय निरूपम यांच्याकडे मुंबईचे अध्यक्षपद सोपविल्यापासून कामत यांच्या गटाचे खच्चीकरणाचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे राजीव व सोनिया गांधी यांच्याशी जवळिक राहिलेल्या व काँग्रेसचे निष्ठावान अशी ओळख असलेले कामत यांची सध्या पक्षात घुसमट होत होती. त्यातच येत्या काही महिन्यात काँग्रेसच्या अध्यक्षपदावर राहुल गांधी विराजमान होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. राहुल गांधी आपल्या नविन व तरूण टीमसह पक्षाचा विस्तार करू पाहत आहेत. दीर्घकालीन विचार करून राहुल यांनी तरूणांना संधी देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे जुन्या जानत्या व अनुभवी नेत्यांना राहुल यांच्या टीममध्ये स्थान असणार नाही. त्यामुळे कामत यांच्यासह काँग्रेसच्या 10 सरचिटणीसांनी राजीनामे सोनिया यांच्या सोपविल्याचे बोलले जात आहे.
राहुल यांच्या टीममध्येही आपल्याला फारसे भविष्य नाही तसेच मुंबईतही निर्णय घेताना पक्षाकडून आपल्याला डावलले जात असल्याची भावना झाल्याने त्यांनी थेट राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. कधीकाळी मुरली देवरा गटाशी दोन हात केलेल्या कामत यांना बाहेरून आलेल्या निरूपम यांच्यासारख्या नेत्यांना मानाचे पान दिल्याचे रूचत नाही. त्यामुळेच आणखी घुसमट होऊ न देण्यासाठी कामत यांनी थेट राजकारणातूनच संन्यास घेतला आहे.
पुढे वाचा, गुरुदास कामत यांच्या राजकीय प्रवासाबाबत...
बातम्या आणखी आहेत...