आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुटखानिर्मिती आता अजामीनपात्र गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बंदी असतानाही राज्यात गुटख्याची निर्मिती सुरू आहे. सध्याच्या कायद्यात जामीन असल्याने नवा कायदा आणण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. या कायद्यानुसार गुटखानिर्मिती करणार्‍यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करता येऊ शकेल, अशी माहिती अन्न औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

विधानसभेत जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रमेश कदम, अवधूत तटकरे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर बापट यांनी बेकायदा गुटखानिर्मिती करणार्‍यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करता यावा असा प्रयत्न सरकार आहे. आजवर ३७०० व्यक्तींवर गुन्हे दाखल केले असून २५ कोटींचा गुटखा नष्ट केल्याची माहिती दिली. दरम्यान, आमदार निवास परिसरात गुटख्याची सर्रास विक्री केली जात असल्याचे सांगत बच्चू कडू यांनी गुटख्याची पाकिटे दाखवली. त्यावर हरकत घेत अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ही पाकिटे बाहेर ठेवून येण्यास सांगितले.

मराठी शाळा बंद पडू देणार नाही : तावडे
मराठीशाळा जगवण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून महाराष्ट्रातील एकही मराठी शाळा अनुदानाअभावी बंद पडू देणार नाही, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिले. मुंबईतील मराठी शाळांच्या अनुदानाचे अर्ज मुंबई महानगरपालिकेने प्रलंबित ठेवल्याचा तारांकित प्रश्न भीमराव धोंडे यांनी उपस्थित केला होता.

१५१ कॉलेजात केवळ १० विद्यार्थी
राज्यातएक विद्यार्थी असणारी तर दोन ते दहा विद्यार्थी असलेली १५१ महाविद्यालये सुरू आहेत. विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याबद्दल विद्यापीठांकडून अहवाल मागविण्यात येणार असून तो सभागृहात पटलावर ठेवण्यात येईल असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. विद्यार्थी नसतानाही महाविद्यलये अनुदान लाटत असल्याकडे गणपतराव देशमुख यांनी लक्ष वेधले होते.