आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुटखा विक्रीसह निर्यातीवरदेखील राज्यभरात बंदीच : उच्च न्यायालयाच्‍या स्प्‍ष्‍टीकरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गुटख्याच्या उत्पादन, विक्री आणि साठवणुकीला बंदी घालणारा अध्यादेश राज्य सरकारने जारी केलेला असल्यामुळे गुटख्याच्या निर्यातीलासुद्धा परवानगी देता येणार नाही, असे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाने सोमवारी दिले. अन्न व औषध प्रशासन विभागाने ताब्यात घेतलेला गुटख्याचा साठा परत मिळावा, या मागणीसाठी एसजेजे गुटखा उत्पादक कंपनीने याचिका दाखल केली होती.

या कंपनीने सुमारे 2 कोटी 70 लाख रुपयांचा गुटखा परदेशात निर्यात करण्यासाठी मुंबई बंदरात आणला होता. परंतु, अन्न व औषध प्रशासन विभाग आणि सीमाशुल्क विभागाने तो जप्त केला. त्याविरोधात कंपनीने दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी खंडपीठासमोर झाली. या गुटख्याचे उत्पादन महाराष्ट्राबाहेर म्हणजे सिल्व्हासा येथे करण्यात आले आहे. गुटख्यावर बंदी नसलेल्या देशात म्हणजे संयुक्त अरब अमिरातीमध्ये त्याची निर्यात करण्यात येणार आहे. तसेच, राज्यात गुटख्यावर जरी बंदी असली तरी निर्यातीवर बंदी घातलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने हा गुटख्याचा साठा कंपनीच्या ताब्यात द्यावा, असा युक्तिवाद कंपनीतर्फे करण्यात आला.परंतु, न्यायालयाने हा युक्तिवाद अमान्य केला.