आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅकर मनीष भंगाळेचा जामीन अर्ज फेटाळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप करणाऱ्या हॅकर मनीष भंगाळेचा जामीन अर्ज मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी फेटाळला आहे. या प्रकरणी झालेले आरोप हे अतिशय गंभीर असून त्याबाबतचा तपासही अजून पूर्ण न झाल्याने जामीन देता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता जामिनासाठी भंगाळेला मुंबई सत्र न्यायालयात धाव घ्यावी लागेल.    
 
गेल्या आठवड्यात गुन्हे शाखेने भंगाळेला अटक केली होती. त्याच्यावर भादंविच्या कलम ४१९ नुसार कागदोपत्री फसवणूक करणे, कलम ४६९ नुसार खोट्या कागदपत्रांचा वापर करून प्रतिष्ठित व्यक्तींची बदनामी करणे, कलम ४६८ अन्वये बनावट कागदपत्रे तयार करणे, तसेच कलम ४७१ अन्वये बनावट कागदपत्रे खरी असल्याचे भासवणे आणि आयटी अॅक्टच्या नियम ६६ ड अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.   ‘आपण दाऊदच्या पाकिस्तानातील निवासस्थानी असलेल्या दूरध्वनी क्रमांकाची देयके सेवा पुरवठादार कंपनीच्या संकेत स्थळावरून हॅक केली अाहेत’ असा दावा भंगाळेने केला होता. 
 
बातम्या आणखी आहेत...