आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगली, कोल्हापूर पट्ट्यात अवकाळी पावसाचा तडाखा, पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सांगली, कोल्हापूर पट्ट्यात काल सायंकाळी वादळी वा-यासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिल्याने शेतक-यांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. दरम्यान, शेतक-यांचे मोठे नुकसान झाल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या भागालाही गारपीटग्रस्तांचे निकष लावून मदती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. गुरुवारी पडलेल्या वादळी पावसाने केळी, ऊसांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वा-यामुळे पीके जमिनदोस्त झाली तर झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने वाहतूकही विस्कळीत झाली होती.

गुरुवारी सायंकाळी सांगली परिसरात वादळी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर कोल्हापूर पट्ट्यातही या पावसाने रंग दाखविले. कागल, गडहिंग्लज परिसराला चांगलेच झोडपले. काही गारांचा वर्षावही झाला. वादळी वारे आणि पावसामुळे केळीच्या बागेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. छाटणी झालेल्या द्राक्षबागा, आंबा आदी पीकाचे नुकसान झाले. 16-17 कांड्यावर आल्येल्या आडसाली ऊस भुईसपाट झाल्याचे चित्र आहे.